तांदूळ धुतल्यावर पाणी फेकून देता का? स्कीन केअरपासून ते पचनक्रियेसाठी आहे संजीवनी..

Rice Water Benefits For Skin: तांदूळ धुतल्यावर त्याचे पाणी फेकून देता का? मग आता असे करु नका, कारण तांदळाच्या पाण्यामुळे तुम्हाला सौंदर्यवर्धक फायदे मिळू शकतात. कदाचित तुम्हाला याबद्दल माहिती नसेल. तांदळाच्या पाण्याने चेहरा आणि केस धुतल्याने आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. कसं ते जाणून घ्या.... 

श्वेता चव्हाण | Updated: May 8, 2023, 01:32 PM IST
तांदूळ धुतल्यावर पाणी फेकून देता का? स्कीन केअरपासून ते पचनक्रियेसाठी आहे संजीवनी..  title=
rice water for the skin care to digestion

Rice Water Benefits in Marathi: आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत जे तुम्ही आपली त्वचा, केस आणि एकूणच आरोग्यासाठी वापरू शकता. जसे की, बऱ्याच वेळा भांड्या भात शिजवताना आपण उरलेले पाणी टाकून देतो. परंतु, हे पाणी आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी तसचे पचनक्रियेपासून आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. जर तांदळाचे पाणी फेकण्याऐवजी रोजच्या आहारात समाविष्ट केले तर ते बऱ्याच प्रकारच्या समस्या दूर करु शकतात. याशिवाय केस, चेहऱ्यावर  आणि पचनक्रियेसाठी त्याचा उपयोग केल्याने बऱ्याच समस्यांपासून आराम मिळू शकतो. चला तर मग, त्याच्या सर्व फायद्यांविषयी जाणून घेऊया...

तांदळाचे पाणी फक्त केसांसाठीच नाही तर त्वचेची निगा राखण्यासाठी देखील या पाण्याचा वापर करु शकता. तांदळाच्या पाण्यात अमिनो आम्ल असते. तसेच अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. हे वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत करते. हे पाणी लावल्याने त्वचेचा घट्टपणाही वाढवण्यास मदत करते. यासोबतच तांदळाचे पाणी टॅनिंग, ब्लॅक स्पॉट्स आणि सनबर्नच्या समस्येपासूनही आराम देते. तुम्ही तांदळाचे पाण्याचा वापर कसाप्रकारे कराल ते जाणून घ्या... 

वाचा : High Cholesterol दूर करायचा? मग हे खास उपाय करा आणि निरोगी जीवन जगा!

 

तांदळाचे पाणी कसे तयार करावे?

एका भांडयात तांदूळ आणि त्यापेक्षा दुप्पट पाणी घालून उकळवा. उकळल्यानंतर भांडे मंद आचेवर झाकण ठेवून काही वेळ पाणी उकळू द्या. यानंतर एक भात एक चमच्याने बाजूला काढा आणि ते व्यवस्थित शिजले आहे की नाही ते तपासा. तांदूळ शिजल्यानंतर चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या व एका भांड्यात पाणी काढून घ्या. हे पाणी चेहऱ्यावर किंवा त्वचेवर वापरु शकता. तसे त्या पाण्यात थोडे तूप आणि मीठ घाला आणि नंतर प्या. असे केल्याने शरीरातील पचनक्रीयेस मदत करते. 

त्वचेसाठी खूप फायदेशीर

तांदळाच्या पाण्यात खनिजे, जीवनसत्त्वे, अमिनो अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. हे सर्व घटक त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तांदुळाचे पाणी त्वचेसाठी चांगले क्लिन्झर आणि टोनर म्हणून खूप फायदेशीर आहे. हे पाणी आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्यापासून चेहऱ्याचे संरक्षण होते. तांदळाचे पाणी कापसात घेऊन हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. कोरडे झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

तांदळाचे पाणी चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या कमी करण्यास मदत करेल, याशिवाय हे पाणी त्वचेवरील छिद्रांची समस्या कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्यास मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होईल शिवाय त्वचेवरील रोमछिद्रांची समस्या कमी होण्यास देखील उपयुक्त आहे. तांदळाचे पाणी फक्त कोरड्या त्वचेसाठी रामबाण उपाय आहे. कोरड्या त्वचेवर किंवा पाण्यामुळे होणारी जळजळ कमी होते. सनबर्नचा धोका कमी करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर केल्यास त्वचेला थंडावा मिळेल.

पचनक्रियेस उपयोगी

सुरुवातीच्या काळात जुलाब किंवा अशक्तपणा असेल तर औषध म्हणून तांदळाची पेज दिली जायची. कारण यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. तांदळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात पोषक असतात. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असते. त्यामुळे या पेयातून शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीराचा थकवा बऱ्याच अंशी दूर होतो. 

उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी उपयुक्त

सध्या वाढत्या उष्णतेमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. जसे की अशक्यतपणा, थकवा, चक्कर यांसारखे आजार उद्भवतात. अशावेळी तांदळाचे पाणी पिणे जास्त फायदेशीर ठरते. ज्यामुळे या पाण्यामधून शरीराला ऊर्जा आणि द्रव देखील मिळते. त्वचारोग तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तांदळाचे पाणी दररोज सुमारे 1 महिना त्वचेवर लावल्यास एक्जिमाच्या आजारात आराम मिळतो. एक्जिमामध्ये मृत त्वचेच्या पेशींना नवीन जीवन मिळते. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि स्वच्छ होते.

 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)