Chia Seeds : चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, मॅग्नेशियम, आयरन, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते. असे म्हटले जाते की चिया सीड्स ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा एक चांगला स्त्रोत आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या बिया खूप स्वस्त आहेत. या बिया सर्वांसाठी फायदेशीर आहेत. या बिया तुमचे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतात. (Chia Seeds Benefits) याशिवाय, त्वचा आणि केसांची समस्या कमी करण्यास देखील मदत करते, तर चला जाणून घेऊया चिया बियांचे सेवन करण्याचे काय फायदे आहेत. (Health News)
हाडांसाठी (Chia Seeds Benefits for bones)
मेनोपॉज मध्ये महिलांसाठी या बिया फायदेशीर मानल्या जातात. या बियांचा सेवनानं हाडे निरोगी राहतात. मेनोपॉज दरम्यान शरीरात हार्मोनल बदल होतात. त्यामुळे महिलांना हाडांच्या दुखण्याला सामोरे जावे लागते. या बियांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सांधेदुखीवरही मदत होते.
वजन कमी होईल (Chia Seeds Benefits for weight loss)
जर तुम्ही वजनाच्या समस्येने त्रस्त असाल तर चिया सीड्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या बियांमध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. म्हणूनच ते वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत.चिया सीड्सचे सेवन केल्यानं आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांना चालना मिळते. तथापि, वजन कमी करण्यासाठी चिया बियाण्यांवरील संशोधनाने संमिश्र परिणाम दिले आहेत.
त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर (Chia Seeds Benefits for skin and hair)
चिया बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. ज्यामुळे रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते. यामुळे त्वचेचा कोरडेपणाही कमी होतो. याशिवाय, त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. मँचेस्टरमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, ओमेगा-3 त्वचेला रेडिएशनपासून वाचवते. चिया सीड्समध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. यामुळे ते हृदयासाठीही निरोगी मानले जातात. यामध्ये फायबर आणि ओमेगा-३ असते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. (Chia Seeds benefits weight loss glassy skin good for health and bones)