हे '5' पदार्थ थेट फ्रीजमध्ये ठेवणं आरोग्याला त्रासदायक

वस्तू दीर्घकाळ टिकाव्यात म्हणून प्रत्येक गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका.

Updated: Jan 22, 2018, 08:58 PM IST
हे '5' पदार्थ थेट फ्रीजमध्ये ठेवणं आरोग्याला त्रासदायक  title=

मुंबई : वस्तू दीर्घकाळ टिकाव्यात म्हणून प्रत्येक गोष्टी फ्रीजमध्ये ठेवू नका.

काही पदार्थ दीर्घकाळ फ्रीजमध्ये साठवल्यास त्यातील पोषकता कमी होते. आरोग्याला त्रासदायक ठरतात.

 अंडी :

अंडी फूटणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावीत. अंडी बाहेरदेखील ठेवू शकता. फ्रीजमध्ये अंडी ठेवल्यास त्याच्यातील नॅचरल टेस्ट आणि फ्लेवर बदलतो.  अंड हे सुपरफूड आहे. याच्या सेवनातून तुम्हांला प्रोटीन, कॅल्शियम, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड मिळेल. प्रोटीन शरीरातील मांंस पेशींना मजबूत करतात. कॅल्शियममुळे दात आणि हाडं मजबूत होतात. ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड शरीरात चांगले कॉलेस्ट्रॉल असतात. तुम्ही पदार्थांना प्रिझर्व्ह आणि सुरक्षित ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ही सवय अपायकारक आहे. 

केळी :

मेडिकल सायन्सनुसार, फ्रिजमध्ये ठेवलेली केळी आरोग्याला अपायकारक ठरू शकतात. फ्रीजमध्ये केळी ठेवल्यास त्यातील पोषक घटक कमी होतात. कच्चे केळे फ्रीजमध्ये ठेवल्यास ते शिजत नाही.  

ब्रेड :

फ्रीजमध्ये ब्रेड ठेवल्यास तो लवकर सुकतो. तो अधिक कडक होतो. अशा ब्रेडपासून बनवलेले पदार्थ टेस्टी लागत नाही.  

कॉफी :

कॉफी कोरड्या ठिकाणी ठेवावी. फ्रिजमध्ये कॉफी ठेवू नये. कॉफी हवाबंद डब्ब्यामध्ये ठेवावी. 

 

टॉमेटो :

टोमॅटो अधिक दिवस टिकवण्यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवले जातात. मात्र यामुळे त्याची चव उतरते. शिजवतानाही टॉमेटो अधिक वेळ घेतात.