मुंबई : दररोज सकाळी मूठभर सुका मेवा खाणं आरोग्यासाठी चांगलं मानले जाते, परंतु हिवाळ्यात जर तुम्ही ड्रायफ्रुट्स जास्त प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे अनेक गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. तुम्ही हे लक्षात घ्या की, कोणत्याही गोष्टीचा अती वापर केल्याने त्याचा परिणाम उलटा होऊ शकतो. त्यामुळे जेवढं गरजेचं आहे, तेवढ्याच प्रमाणात त्याचे सेवन करा. बऱ्याचदा लोकांचा असा गौरसमज होतो की, सुका मेवा चांगला आहे, म्हणून आपण त्याला जास्त खावे म्हणजे आपल्याला त्याचा डबल फायदा होईल, परंतु तसे नाही. असं केल्यास तुमचं जास्त नुकसान होऊ शकते. कारण तज्ज्ञांच्या मते, सुक्या मेव्याचे साइड इफेक्ट्स देखील आहेत.
जाणून घ्या सुका मेवा खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावरती त्याचा कसा परिणाम होऊ शकतो.
बरेच लोक वजन कमी करण्यासाठी सुका मेवाचे सेवन करतात, परंतु त्यांना हे माहित असणं गरजेचं आहे की, जास्त प्रमाणात ते खाल्याने त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. कारण सुका मेव्याच्या अतिसेवनाने वजन वाढू शकते.
सुका मेव्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण असते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने साखरेची पातळी वाढू शकते .जर तुम्हाला डायबिटीजची समस्या असेल तर हे लक्षात ठेवा की, जास्त प्रमाणात सुका मेवा खाणं त्यांच्यासाठी विषापेक्षा कमी नाही.
काही वेळेला सुका मेवा खाल्ल्याने शरीरातील फ्रक्टोजचे प्रमाण वाढते. फ्रक्टोजचं प्रमाण वाढल्याने दात देखील खराब होऊ शकतात. त्यामुळे दात किडण्याची समस्या देखील उद्भवू शकते.
सुका मेवा हा फायबरचा चांगला स्रोत आहे, परंतु त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. सुक्या मेव्याचे जास्त सेवन केल्यास अपचन, पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास होतो.
(टीप: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. 'झी 24 तास' याची कोणतीही पुष्टी करत नाही.)