Benefits of Socked Peanuts: आपल्या सगळ्यांना भाजलेले अथवा भिजलेले शेंगदाणे कधीही खायला आवडतात. पुर्वी जेव्हा जंग फूड आणि फास्ट फूड (Fast Food) नव्हतं तेव्हा शेंगदाणे खाण्याची मज्जा काही औरच होती. (eat socked peanuts and stay strong these are the useful benefits of peanuts)
एका संशोधनात असे दिसून आले आहे की शेंगदाण्यामुळे महिलांमध्ये टाइप 2 मधुमेहाचा (Diabetes) धोका कमी होतो तसेच शेंगदाणे शरीरातील वाढत्या कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात आणि यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'
शेंगदाण्यांमुळे शरीरही तंदुरूस्त राहते. तेव्हा रात्री झोपण्यापूर्वी शेंगदाणे पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर नाश्त्यामध्ये त्याचा समावेश करा. आम्ही तुम्हाला सांगतो की रात्रीच्या वेळी ते खाणे टाळावे कारण ते पचायला जास्त वेळ लागतो.
असे आहेत फायदे:
सध्याच्या युगात खराब जीवनशैलीमुळे लोकांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे बहुतेक लोकांची पचनसंस्था बिघडली आहे. खराब पचनसंस्था अपचन आणि लठ्ठपणा यांसारख्या अनेक आजारांना जन्म देते. त्यामुळे लोकांचे वजन झपाट्याने वाढू लागते. रोज शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील चयापचय क्रिया योग्य राहते, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरातील चरबीही हळूहळू कमी होऊ लागते. चला जाणून घेऊया शेंगदाणे आणि त्यांचा आपल्याला कसा फायदा होतो.
आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे
शेंगदाण्यात फायबर (Fiber) आणि जीवनसत्त्वेही मुबलक प्रमाणात आढळतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स (Anti Oxidants) आणि कॅल्शियमही (Calcium) भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. यामध्ये आढळणारे कॅल्शियम शरीरातील हाडे आणि दात मजबूत करते.