Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत. 

Updated: Jan 16, 2022, 03:31 PM IST
Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? title=

Carrot Benefits :  रोगप्रतिकारकारक शक्ती वाढवण्यासाठी हिवाळ्यात गाजर (Carrot) खाऊ शकता. गाजराला हिवाळ्यातील सूपरफूड म्हटलं जातं. गाजर पोषक त्तवांनी परिपूर्ण असतं. हिवाळ्यात गाजराचं सेवन करणं अनेक दृष्टीने फायदेशीर असतं. गाजरमध्ये व्हिटामीन ए, सी आणि केसह मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. गाजराचा आहारात सॅलड, भाजी, सूप, ज्यूस अशा विविध पद्धतीने समावेश करु शकता.  (eye health immune systemread these tremendous benefits of eating carrots)
 
गाजर खाल्ल्याने रातांधळेपणाचा त्रास नाहीसा होता. तसेच दृष्टी सुधारण्यास मदतही होते. गाजरात असलेल्या बीटा कॅरोटीनचा फायदा होतो.  त्याचे पोटात व्हीटॅामिन ए मध्ये रूपांतर होतं.

गाजरात फॅलकारिनॉल नावाचे नैसर्गिक कीटकनाशक आढळून येते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो, असं अनेक स्टडीद्वारे समोर आलं आहे.  

वाढत्या वयानुसार अनेक त्रास उद्भवतात. मात्र गाजर खालल्याने वृद्धत्वाचा प्रभाव काही होण्यास मदत होते. 

गाजर ज्यूसमध्ये काळं मीठ, कोथिंबीर, भाजलेले जिरे, काळी मिरी आणि लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास पचनाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होते.