गणेशोत्सव विशेष - ऋषीपंचमीची भाजी कशी बनवाल?

परदेशात जसा ‘ऑल सेंट्स डे’साजरा केला जातो. तसे हिंदूधर्मीय भारतात ‘ऋषीपंचमी’साजरी करतात. आजच्या दिवशी ऋषीमुनींनी दिलेल्या शिकवणीचे स्मरण केले जाते .तसेच आहारात बैलाच्या मेहनतीने न पिकवलेल्या तांदळाचा तसेच भाज्यांचा आहारात समावेश केला जातो. यामध्ये लाल माठ, भेंडी, अळू, भोपळा, सुरण, मका, वाल अशा विविध भाज्या मिसळून एकत्र भाजी तयार केली जाते. मग पहा या चविष्ट आणि आरोग्यदायी भाजीची खास रेसिपी !

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Aug 25, 2017, 02:00 PM IST
गणेशोत्सव विशेष - ऋषीपंचमीची भाजी कशी बनवाल?  title=

मुंबई : परदेशात जसा ‘ऑल सेंट्स डे’साजरा केला जातो. तसे हिंदूधर्मीय भारतात ‘ऋषीपंचमी’साजरी करतात. आजच्या दिवशी ऋषीमुनींनी दिलेल्या शिकवणीचे स्मरण केले जाते .तसेच आहारात बैलाच्या मेहनतीने न पिकवलेल्या तांदळाचा तसेच भाज्यांचा आहारात समावेश केला जातो. यामध्ये लाल माठ, भेंडी, अळू, भोपळा, सुरण, मका, वाल अशा विविध भाज्या मिसळून एकत्र भाजी तयार केली जाते. मग पहा या चविष्ट आणि आरोग्यदायी भाजीची खास रेसिपी !

साहित्य -: 
भाजीच्या अळूची पानं 
कोवळा माठ व त्याची पानं 
लाल भोपळा
वाल 
मटार
कोवळी भेंडी
चिंचेचा कोळ
मीठ
ओलं खोबरं

कृती -: 

प्रथम भाजीचा अळू स्वच्छ धुऊन बारीक चिरावा. 
त्यानंतर पातेल्यामध्ये किंवा थेट कुकर मध्ये अळू, मका, मटार चिरलेला भोपळा, कोवळी भेंडी, वाल, माठाची पानं आणि माठाच्या कोवळ्या दांड्या सारं एकत्र शिजवा. 
अळू शिजताना त्यामध्ये चिंचेचा कोळ, हिरव्या मिरच्या, खोबर्‍याचा कीस आणि मीठ घाला. 
सारी भाजी नीट शिजल्यानंतर गॅस बंद करा. 

          तुम्ही कमी स्वरूपात भाजी करणार असाल तर सारी भाजी थेट प्रेशर कुकरमध्ये लावू शकता.  ऋषी पंचमीचा उपवास असणार्‍या स्त्रिया जेवणात केवळ ही ऋषीची भाजी आणि भात खातात. सोबतीला तुम्ही खोबर्‍याची चटणी, काकडी आणि दही खाऊ शकता.