Health News : जर तुमच्या तोंडातून घाण वास येत असेल तर त्याचे कारण फक्त तोंडाची अस्वच्छता नसून, त्यामागेसुद्धा काही गंभीर कारणे असू शकतात. त्यांना वेळीच ओळखणे आवश्यक आहे.
तोंडाची दुर्गंधी आपल्याला जाणवत नाही, पण आपल्या आजूबाजूच्या लोकांना या समस्येला सामोरे जावे लागते. तोंडाच्या दुर्गंधीचे प्राथमिक कारण म्हणजे तोंड व्यवस्थित स्वच्छ न करणे. सामान्यत: दिवसातून दोन वेळा दात घासण्याचा सल्ला डॉक्टरही (Doctors) देतात, पण काही लोकं यातही आळशीपणा करतात. ज्यामुळे तोंडात जिवाणू वाढीस लागतात, नंतर त्यांना तीव्र वास येतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की तोंडाच्या दुर्गंधीची समस्या ही आणखी एका कारणामुळेही होऊ शकते. जर तुमच्या शरिरातील कोणता अवयव खराब झाला असेल तरीही तुमच्या तोंडातुन दुर्गंधी येऊ शकते. त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया.
1. फुफ्फुस...(Lungs)
फुफ्फुसांच्या संसर्गामुळे देखील तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. तुमच्या फुफ्फुसांत काही कारणास्तव संसर्ग झाला असेल तर दुर्गंधीत कफ बाहेर निघू लागतो, त्यामुळे तोंडातून दुर्गंधी येणे निश्चित आहे.
2. यकृत... (Liver)
यकृताचा काही आजारही तोंडाच्या दुर्गंधीचे कारण बनू शकतो. यकृत आपल्या शरिरातील रक्तातील साखर (Blood Sugar) नियंत्रणात ठेवते, पण जेव्हा हे काही कारणास्तव हे शक्य होत नाही तेव्हा रक्तातील विषारी पदार्थ वाढतात, ज्यामुळे तोंडातून दुर्गंधी येऊ लागते.
3. मूत्रपिंड... (Kidney)
जर तुम्हाला मूत्रपिंडाचा आजार असेल तर, या आजारात तोंड सुकण्याची समस्या होऊ लागते. जेव्हा मूत्रपिंडाचे आरोग्य चांगले असते, तेव्हा मूत्र शुद्धिकरणाची प्रक्रिया सुरळीत सुरु असते. पण जर तुमच्या मूत्रपिंडामध्ये काही समस्या झाली असल्यास मूत्र व्यवस्थित फिल्टर होत नाही. हेच तोंडाच्या दुर्गंधीचे कारण बनते.
तोंडाची दुर्गंधी येण्याची आणखी काही कारणे :
वरील सगळ्या समस्यांव्यतिरिक्त अजून काही कारणास्तव तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. बहुतेक आरोग्य तज्ज्ञांचा मते, मधुमेह (diabetes) होण्याच्या सुरुवातीची लक्षणे असू शकतात, कारण अशा स्थितीत तोंडातून अॅसिटोनचा वास येऊ लागतो. रक्तातील केटोन्सची पातळी वाढणे हे देखील यामागचे कारण असू शकते.