मुंबई : केस, चेहरा आणि त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी व्हिटॅमिन ई सर्वोत्तम आहे. आपण याचा वापर करुन चेहरा आणि केस चांगले ठेवू शकता. हे वापरण्यासाठी पाच मार्ग आहेत.
अँटीऑक्सिडंट्स भरलेले तेलाचे हे कॅप्सूल जवळच्या वैद्यकीय स्टोअरमध्ये मिळू शकते. व्हिटॅमिन ई देखील सौंदर्य व्हिटॅमिन म्हणून ओळखले जाते. आपण ते कसे वापरावे याची माहिती देत आहोत. आपण आपल्या त्वचेचा सौंदर्य वाढवू शकता, तसेच केसांना चमकदारपणा आणू शकता. या जीवनसत्त्वाच्या माध्यमातून आपल्या त्वचेची चमक वाढवू शकता.
व्हिटॅमिन-ई मध्ये अँटिऑक्सिडेंटची गुणधर्म आहे. आपल्या चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहेत. परंतु, सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की, आपण ते योग्य वापरता किंवा नाही. कारण, जर ते व्यवस्थित वापरले असेल तर त्याचे परिणाम एका आठवड्याच्या आत आपल्याला दिसण्यास सुरुवात होईल.
आपण आपल्या चेहऱ्यासाठी व्हिटॅमिन-ई कॅप्सूल सहजपणे वापरू शकता. व्हिटॅमिन ई त्वचा कोरडी होण्यापासून प्रतिबंधित करते आणि चमकदार बनवते. रोज झोपण्याच्याआधी बदाम आणि नारळ तेलात ते मिसळून घ्या. तुम्ही थंडीत त्याचा मॉश्चराईजर, लोशन म्हणून वापर करु शकता.
जेव्हा आपल्या डोळ्यांना थकाव जावत असेल किंवा डोळ्यांखाली डार्क सर्कल आले असेल तर त्यावर एक उत्तम उपाय म्हणून हे कॅप्सूल उपयोगी ठरते. आपल्या डोळयांखाली व्हिटॅमिन ई तेल लावू शकता. काही दिवसात त्याचा प्रभाव दिसून येईल.
आपण व्हिटॅमिन-ई वापर केवळ त्वचेसाठी नाही तर केसांसाठी करु शकता. याच्या वापरामुळे केस घनदाट आणि चमकदार होऊ शकतात. आपल्या रोजच्या वापरात असलेल्या तेलाच्या माध्यमातून त्याचा वापर करु शकता. आपण प्रथम केस धुण्याआधी एक दिवस आधी नारळाच्या तेलात मिसळून त्याचा केसांसाठी वापर करु शकता. त्यानंतर सकाळी केस धुवा.
आपण व्हिटॅमिन ई चा वापर ओठांसाठी करु शकता. यामुळे ओठ मऊ आणि चमकदार बनतात. झोपण्याआधी कॅप्सूलमधील द्रव काढून ते बदामाच्या तेलात मिसळा किंवा ग्लिसरीन सोबत एकत्र करा. ते झोपण्यापूर्वी ओठांना लावा. ओठ चमकदार आणि मऊ होती.
महिलांना गरोदरपणानंतर स्ट्रेच मार्क्सचा सामना करावा लागतो. हे स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल खूप लाभदायक आहे. बदाम किंवा खोबरेल तेलात मिसळून लावल्याने स्ट्रेच मार्क्स जाण्यास मदत होते.
आपण चेहरा धुण्यासाठी या फेसपॅक म्हणून वापर करु शकता. चेहऱ्याला लावल्यामुळे चेहरा खेचला जातो. त्यामुळे तुमची त्वचा चांगली आणि मुलायम होण्यास मदत होते.