Health News Tips : तुमच्या शरीराबाबत इतके निष्काळजी होऊ नका, ज्याचा त्रास तुम्हाला दीर्घकाळ सहन करावा लागू शकतो. (Health News In Marathi) जर तुम्ही अनेक तास एकाच स्थितीत बसत असाल तर तुमची ही सवय लगेच मोडा. अन्यथा तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. मेंदूच्या नसांवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.
अनेक लोक त्यांच्याऑफीस तसेच घरात तासनतास बसून राहतात त्यांना स्पॉन्डिलायटिसच्या समस्येला सामोरे जावे लागते. स्पॉन्डिलायटिस ही एक समस्या आहे, ज्यामध्ये मानेपासून पाठीपर्यंत वेदना आणि कडकपणा कायम राहतो. हा त्रास सहसा एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यामुळे होतो. त्यामुळे दोन तासांपेक्षा जास्त एकाच पोजिशनमध्ये बसून राहू नये. मध्ये मध्ये उठावे आणि थोडावेळ चालले पाहिजे. तसेच दोन तासांपेक्षा जास्त एकाच पोजिशनमध्ये बसून राहिल्याने अकाली मृत्यूचा धोका अनेक पटीने वाढतो, असे संशोधनात स्पष्ट झालंय.
वर्किंग लोक कामाच्या प्रेशरमुळे अनेक तास एकाच जागेवर आणि एकाच पोजिशनमध्ये बसून काम करतात. त्यांना या गोष्टीचा अजिबात अंदाज नसतो की, ते त्यांच्या आरोग्यासोबत खेळत आहेत. हे आम्ही नाही सांगत तर एका रिसर्चमधून समोर आले आहे.
अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या रिसर्चनुसार, दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ एकाच पोजिशनमध्ये बसून राहिल्याने अकाली मृत्यूचा धोका अनेक पटीने वाढतो. रिसर्चनुसार सतत खुर्चीवर बसून राहिल्याने वेगवेगळ्या आजारांनी मृत्यूचा धोका 27 टक्के आणि टेलिव्हिजन बघून होणाऱ्या आजारांनी मृत्यूचा होण्याचा धोका 19 टक्के वाढतो.
एकाच स्थिती जास्त वेळ बसून राहिल्याने पाठीचा मणक्यावर आणि हाडांवर जास्त दाब येतो. तसेच सरळ न बसता वाडके होऊन बसल्याने मणक्याची हाडे आणि जॉइंट्स खराब होऊ शकतात. याने पुढे जाऊन पाठीत दुखणे आणि मान दुखणे या समस्यांना सामोरे जावे लागते.
जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने मांसपेशीतील चरबी कमी खर्च होते. ज्यामुळे फॅटी अॅसिड हृदयाच्या कार्यप्रणालीमध्ये अडचण निर्माण करते. एकाच स्थितीत जास्त वेळ बसून राहिल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक वाढतं आणि सोबतच अनेक प्रकारचे कॅन्सर आणि इतरही गंभीर आजार होऊ शकतात.
संशोधनातून समोर आले आहे की, एकाच ठिकाणी आणि एकाच जागेवर जास्त वेळ बसल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त वेळ बसून राहिल्याने आपल्या मांसपेशी क्रियाशील राहत नाहीत. ज्यामुळे आपल्या मेंदूला पुरेसं रक्त आणि ऑक्सिजन मिळू शकत नाही.
काम करताना ऑफीस किंवा घरात खुर्चीवर बसताना सरळ बसा आणि पाय जमिनीवर ठेवा. अनेकदा खुर्चीवर बसताना लोक खुर्चीची उंची वाढवतात आणि पाय हवेत लटकत असतात. ही बसण्याची योग्य पद्धत नाही. कारण हवेत पाय लटकल्याने कंबरेच्या हाडावर दबाव पडतो, ज्याने गुडघ्यात आणि पायांमध्ये वेदना होतात. याने कंबर आणि पायांसोबतच पाठीचा कण्याला इजा पोहोचते.
- घरी किंवा कार्यालयात खुर्चीवर बसताना पायांना जमिनीवर ठेवा. कधीही पुढच्या बाजूने वाकून बसू नका. तुमचं पूर्ण वजन हे खुर्चीच्या मागच्या बाजूला ठेवा. कॉम्प्युटर तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. काम करताना पाय क्रॉस करुन बसणेही योग्य नाही. यामुळे नसा दबण्याची शक्यता आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)