Avoid Eating Egg in More Quantity: आपल्या नाश्यात अंड्यांचे सेवन असते. ऑम्लेट (Egg Omlet) नाहीतर भुरजी असे पदार्थ आपण आवडीनं खातो. पण थांबा.. तुम्ही जर प्रमाणापेक्षा जास्त अंडी खात असाल तर सावध व्हा कारण अंड्यांचं अतिसेवन तुम्हाला गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतं. (health tips eating more eggs can effect your health can cause such diseases)
आपण ऐकतो की डाएट सल्लागार आपल्याला त्यांच्या खाण्यामध्ये अंड्यांचा समावेश करण्यासाठी सांगतात. कारण अंड्यांत आवश्यक ते गुणधर्मही असतात. अंडी खाल्याने तुमच्यात प्रोटीनचं प्रमाण वाढतं. वजन कमी असण्याची समस्याही कमी होते त्यातून अंडी खाल्यानं स्मरणशक्ती वाढते. पण अति प्रमाणात अंडी खाणं हे आरोग्यासाठी धोकादायकही ठरू शकत. (Benefits of eggs)
आणखी वाचा - प्रेग्नंट आलियाला त्यानं Kiss केलं तेव्हा... घरचे झाले शॉक!
जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्यानं नाही नाही ते आजार उद्भवतात. तेव्हा जाणून घेऊया या आजारांबद्दल. तज्ञांच्या म्हणण्यानुसार एका दिवसात दोनपेक्षा जास्त अंडी खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही. एका अहवालानुसार, एका अंड्यामध्ये 75 कॅलरीज असतात. त्यामुळे 2 अंड्याचे सेवन केल्यास 150 कॅलरीज तुमच्या शरीरात शिरतात. आणि जर याही पेक्षा जास्त अंडी खाल्लीत तर तुमच्या कॅलरीज अजून वाढतील.
याप्रमाणे जर तुम्ही तीन आठवडे दररोज तीन अंडी खाल्ल्यास तुमचे वजन 1 पौंडनं वाढू शकते. यासाठी दररोज मर्यादित प्रमाणात अंडी खा. दररोज 2 पेक्षा जास्त अंडी खाल्ल्याने लठ्ठपणा येऊ शकतो. (side effects of eggs)
आरोग्य तज्ज्ञांच्या मते हृदयरोग्यांनी अंड्याचे सेवन करू नये. विशेषतः अंड्याचा पिवळा भाग खाऊ नका. यामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. हे हृदयासाठी चांगले नाही. याशिवाय उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनीही अंडी खाऊ नयेत. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर अंड्यातील पिवळा भाग अजिबात खाऊ नका. त्याच्या सेवनाने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)