दाढी, मिशीतील पांढर्‍या केसांना काळेभोर करतील हे घरगुती उपाय

आजकाल बिअर्ड लूकची चलती आहे.

Updated: Apr 24, 2018, 12:59 PM IST
दाढी, मिशीतील पांढर्‍या केसांना काळेभोर करतील हे घरगुती उपाय  title=

 मुंबई : आजकाल बिअर्ड लूकची चलती आहे. मुलांचा बिअर्ड लूक मुलींनाही भावतो. मात्र संतुलित आहाराच्या अभावामुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्याही वाढत आहे. मग दाढी-मिशीतही पांढरे केस वाढतात. मग हे पांढरे केस काळे करण्यासाठी काही घरगुती उपायच फायदेशीर ठरू शकतील. 
 
घनदाट दाढी मिशी वाढवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की वापरुन पहा.  

साजूक तूप 

गाईच्या दूधापासून बनवलेले शुद्ध तूप दाढी आणि मिशीचे केस घनदाट करण्यासाठी फायदेशीर ठरते. नियमित साजूक तुपाच्या मसाजाने केसांचा नैसर्गिक स्वरूपातील काळसरपणा टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.  

अळशी

आहारातही अळशीचा समावेश केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. अळशीतील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड मुबलक असते. रोज चमचाभर अळशी खाल्ल्याने दाढी काळीभोर राहण्यास म्दत होते.  

दालचिनी पावडर 

दालचिनीच्या पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. या पेस्टला 15 मिनिटं चेहर्‍यावर लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. या उपायाने चेहरा तजेलदार राहण्यास सोबतच चेहर्‍यावरील केस घनदाट होण्यास मदत होते.