मुंबई : प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात धुळीचे कण अढळतात. आपण मुख्यत: भाज्या आणि फळे रस्त्यावरून खरेदी करतो. या भाज्या आणि फळे नुसते एकदा साध्या पाण्यात धुतल्याने त्यातील फक्त २० टक्के कीटकनाशके नष्ट होतात, आणि ८० टक्के कीटकनाशके भाज्यांवर तसेच असतात. त्यामुळे पोटाचे विकार उद्भवतात. तसेच ऑरगॅनिक फूड असले तरी पिकवताना कीटनाशक वापरलेली असू शकतात. तर जाणून घ्या कसे स्वच्छ कराल फळं आणि भाज्या.
- फळं आणि भाज्यां एका कंटेनरमध्ये पुरेश्या पाण्यात एकत्र करून घ्या. यात एक मोठा चमचा व्हिनेगर मिसळा. १५ मिनिटे ते तसेच राहू द्या. नंतर फळं- भाज्या काढून चांगल्या पाणी धुऊन घ्या.
- एका स्प्रे बॉटलमध्ये तीन भाग पाणी आणि एक भाग व्हिनेगर मिसळून वापरा. व्हिनेगर ९८ टक्के कीटनाशके घालवण्यात मदत करते.
- पाण्यात बेकिंग सोडा मिसळून फळं आणि भाज्या 15 मिनिटासाठी असेच राहू द्या. नंतर फळं- भाज्या काढून चांगल्या पाणी धुऊन घ्या. बेकिंग सोड्याने 100 टक्के हानिकारक घटक साफ होतात.
- भाज्या आणि फळभाज्या शिजवून घेणे सर्वात उत्तम ठरेल आणि फळं सोलून खाणे योग्य ठरेल.