डॉक्टरांकडे जायचं म्हटलं की अनेकांना इंजेक्शन घेण्याची भिती वाटते. पण आता इंजेक्शनला घाबरण्याची अजिबात गरज नाही. याचं कारण आयआटी बॉम्बेच्या वैज्ञानिकांनी एक नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्यांनी शॉकवेव्ह बेस्ड नीडल फ्री सीरिज तयार केली आहे. यामध्ये सुईच्या जागी उच्च-ऊर्जा दाब लहरींचा (शॉकवेव्ह) वापर करतात. ही सीरिज कोणत्याही वेदना किंवा जखम न होता आपल्या शरिरात पोहोचते.
ही सिरिज सुईप्रमाणे आपल्या त्वचेला भेदून जात नाही. याउलट हे औषध शॉकवेव्हच्या मदतीने आपल्या त्वचेच प्रवेश करतं. हे औषध इतक्या वेगाने आपल्या त्वचेत पोहोचते की आपल्या वेदना जाणवत नाही. हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आयआयटी बॉम्बेच्या एअरोस्पेस इंजिनिअरिंग विभागाच्या टीमने मोठं योगदान दिलं आहे.
- जे लोक सुईला घाबरतात
ज्यांना लस किंवा इंजेक्शन मिळण्याची भीती वाटते.
- मधुमेहाचे रुग्ण
ज्यांना रोज इन्सुलिन घ्यावे लागते.
- संसर्ग प्रतिबंध
ही सिरिंज संसर्गाचा धोका कमी करते कारण सुईचा वापर होत नाही.
- सिरिंजचे नोझल अत्यंत पातळ आहे (केसांची रुंदी असते तितकी 125 मायक्रॉन)
- कोणत्याही वेदना किंवा दुखापतीशिवाय औषध शरीरात पोहोचते
- औषधाची अचूक मात्रा योग्य ठिकाणी पोहोचेल असं डिझाइन करण्यात आलं आहे
- त्वचा आणि ऊतींना कोणतंही नुकसान होत नाही
- खर्च पारंपारिक इंजेक्शनपेक्षा कमी आहे.
शॉक सिरिंजची उंदरांवर चाचणी करण्यात आली जिथे विविध औषधं वापरली गेली. परिणामांवरून असं दिसून आलं की, ही सिरिंज पारंपारिक सुईइतकीच प्रभावी आहे.
- इन्सुलिन दिल्यावर : रक्तातील साखर दीर्घकाळ नियंत्रित राहते.
- अँटीफंगल आणि ऍनेस्थेटिक औषधे: त्वचा आणि रक्तामध्ये चांगले प्रवेश करतात.
- कमी जळजळ आणि त्वचेला कमी नुकसान.
हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरण्यास तयार असल्याचं संशोधकांचं मत आहे. शॉक सिरिंजमुळे औषधं लवकर आणि सुरक्षितपणे दिली जाऊ शकतात. या तंत्रज्ञानामुळे आरोग्य सेवा क्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो.