Kiss Benefits : चुंबन घेण्याचे आहेत अनेक फायदे, जाणून व्हाल अवाक्

Benefits Of Kiss : आरोग्यासाठी चुंबन घेण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. एका दांताच्या डॉक्टरने असाही दावा केला आहे की, तोंडाच्या आरोग्यासाठी दररोज किस करणे फायदेशीर आहे.   

Updated: Jan 13, 2023, 08:30 AM IST
Kiss Benefits : चुंबन घेण्याचे आहेत अनेक फायदे, जाणून व्हाल अवाक् title=
Kiss Health Benefits weight loss Immunity strong Happy hormones stress free Heart healthy Burn calories Kiss Benefits marathi health news

Kiss Health Benefits : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांचं चुंबन (Kiss) घेतलं आणि नव्या वादाला तोंड फुटलं. आपण अनेक वेळा प्रेमी युगुलांना रोमान्स (Romance) करताना पाहिलं आहे. हाता हात असतो गळ्यात गळे अगदी एकमेकांना किस करताना ते अनेक वेळा कुठे ना कुठे दिसतात. कधी बागेत तर कधी रेल्वेमध्ये अगदी कधी कधी तर भररस्त्यात त्यांचा रोमान्स चालू असतो. किस केल्यामुळे जोडप्यामधील प्रेम (love) घट्ट होतं. किस करणे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. नुकताच मुंबईतील 31 डिसेंबरचा एका मुला मुलीचा किस करताना व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media Video) चांगलाच गाजला होता. हॉटेलच्या रुममध्ये असताना खिडकीचे परदा लावण्यास हे कपल विसरलं आणि मग काय त्याच्यामधील रोमान्स हा सोशल मीडियावर व्हायरल झाला. बॉलिवूडमधीलही (Bollywood kiss) अनेक अभिनेता अभिनेत्रीचे सोशल मीडियावर आपल्याला त्याने हिला किस केलं हिने त्याला किस केलं अशा मथळाच्या बातम्या आपण पाहिला आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? KISS करण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हे फायदे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. चला तर जाणून घेऊयात किस करण्याचे फायदे.  (Kiss Health Benefits weight loss Immunity strong Happy hormones  stress free Heart healthy Burn calories Kiss Benefits marathi health news)

 

वजन कमी करण्यास मदत (weight loss)

हो, अगदी बरोबर वाचलं तुम्ही...जर तुम्ही 1 मिनिट किस (Kiss Benefits) केलं तर तुम्ही 26 कॅलरीज बर्न (Burn calories) करू शकता. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही जेवण्यानंतर मिठाई खाल्ली असेल त्यामुळे शरीरात कॅलरीज जमा झाल्या असतील त्या दीर्घकाळ किस केल्यामुळे तुम्ही बर्न करु शकता. 

इम्युनिटी स्ट्राँग (Immunity strong)

किस केल्यामुळे सायटोमेगॅलो विषाणूविरूद्ध महिलांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. शिवाय किस करताना आपण बग्स आणि व्हायरस ट्रान्सफर करतो, ज्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली होती. 

हॅप्पी हार्मोन्स तयार होतात (Happy hormones)

तुम्हाला माहिती आहे की, किस केल्यामुळे तुमच्या शरीरात हॅप्पी हार्मोन्स तयार होतात. जेव्हा तुम्ही किस करता तुम्हाला मेंदूतून ऑक्सीटोसिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन हे हॅप्पी हार्मोन्स बाहेर पडतात. या परिणाम तुमच्या मूडवर होतो. तुम्ही आनंदी आणि उत्साही राहता. याशिवाय किस केल्यामुळे शरीरातून कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन बाहेर पडतो. त्यामुळे तुम्ही आनंदी राहण्यास मदत होते. 

चिंता आणि तणावमुक्त होता (Anxiety and stress free)

किस केल्याने तुमच्या शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनची पातळी कमी होते. याचा फायदा तुम्ही तणावमुक्त होता. तज्ज्ञ असंही म्हणतात की किस केल्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळते. 

हृदय निरोगी राहते (Heart healthy)

किस केल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि रक्तदाब नियंत्रणात राहतं. जर तुमचा रक्तदाब नियंत्रित असेल तर तुमचं हृदय देखील निरोगी राहतं.

चेहऱ्याच्या स्नायूंसाठी चांगलं (Good for facial muscles)

किस केल्यानं तुमच्या संपूर्ण चेहऱ्याची मसाज होते. ज्यामुळे शरीराचे हे स्नायू घट्ट आणि टोन्ड होतात. किस करताना चेहऱ्याचे रक्ताभिसरण वाढतं, त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग उजळ होतो आणि तुम्ही तरुण दिसू लागतात.

एका डॉक्टरचा असाही दावा

एका डॉक्टरने असा दावा केला आहे की, जो फायदा ब्रशिंग केल्याने होतो, तोच फायदा किसिंगमुळेही होतो. दररोज चार मिनिटं किस केल्याने दातांना ब्रश (Brush) केल्यासारखाच फायदा होतो. त्यामुळे दररोज चार मिनिटं किस करण्याचा सल्ला या डॉक्टरने दिला आहे. स्मूच (smooch) केल्याने तोंडातील सलाइव्हा प्रोडक्शन म्हणजे लाळेची निर्मिती वाढते आणि तोंडात दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांचा नाश होतो, असं या डॉक्टरचं म्हणणं आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)