मुंबई : हिवाळ्याला (Winter) सुरुवात झालीय. ऋतुनुसार आपण आपल्या आहारात बदल करतो. ऋतुनुसार आहारात बदल करणं महत्त्वाचं असतं. खजूर सूपरफूड आहे, ज्याचा हिवाळ्यात आहारात समावेश करु शकता. खजूरमध्ये (Dates) अनेक पोषक तत्तवांच समावेश असतो. (know many benifites of eating dates in winter)
खजूरच्या सेवनाने व्हीटामिन्स, मिनरल्स, फायबर, कॅल्शियम, पोटेशियम, फॉस्फरस आणि कॉपर अशी पोषकत्तव असतात. खजूरामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी मदत होते. खजुरात सॉफ्ट, सेमी ड्राय आणि ड्राय असे 3 प्रकार असतात.
हिवाळ्यात शरीराचं तापमान कमी होतं. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. खजूर खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. खजूरचा सकाळी आणि संध्याकाळी आहारात समावेश केल्यास स्टामिना वाढतो, ज्यामुळे हिवाळ्यात सुस्तपणा जाणवत नाही.
हिवाळ्यात झोप पूर्ण झाल्यानंतरही सूस्तपणा वाटत असेल तर खजूर खायला हवेत. खजूरात कार्ब्स असतात, ज्यामुळे उर्जा मिळते. व्यायामाआधीही खजूर खाऊ शकता.
सूचना : इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE NEWS त्याची पुष्टी करत नाही.)