Sexual Health: सध्या विवाहितांमध्ये सेक्सची इच्छा कमी झाल्याचे दिसून येत आहे, वाढत्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, धावपळ आणि नोकरी या कारणांमुळे हे होत असल्याचं सांगण्यात येत आहे.
सेक्स हा सुखी वैवाहिक जीवनात एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक जोडप्यांमध्ये मतभेद होत असतात. तर मग पाहा काय आहेत, इच्छा कमी होण्याची काही कारणे.
दररोज कमीत-कमी ६ ते ७ तास झोप पूर्ण होत नसेल, तर हे सेक्स लाईफसाठी नक्कीच चांगले नाही. यासाठी पुरेशी झोप घ्या
सेक्सचा आनंद घ्यायचा असेल तर आपले शरीर फिट ठेवा. कारण शरीर निरोगी असेल तर सेक्स करण्याची इच्छा होते. पण जर तुम्ही किंवा जोडीदार जर सतत आजारी असेल तर सेक्स हा कंटाळवाणा असू शकतो.
रात्री झोपताना फोन आणि लॅपटॉप या गोष्टी नेहमी दूर ठेवा. जर तुम्ही सतत जवळ फोन आणि लॅपटॉप ठेवत असाल तर हे चुकीचे आहे.
उत्तम सेक्ससाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. आहारात नेहमी डार्क चॉकलेट, द्राक्ष, जायफळ या पदार्थांचा समावेश करा.
सेक्सची इच्छा कमी होण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे, जास्त दारू किंवा सिगरेट घेतल्याने तुम्ही इनऑर्गेंजमियाचे शिकारी होऊ शकतात.
औषधांच्या अतिसेवनामुळेही याची इच्छा कमी होते. जास्त प्रमाणात औषधांचे सेवन करणेही सेक्ससाठी धोकादायक आहे. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या आपल्या अवयवांची कार्य़शक्ती कमी करणाऱ्या आहेत का हे गुगलवर तपासा, खास करून जास्त काळ स्टेरॉड घेणेही धोकायदायक आहे, तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मधुमेहाने ग्रस्त असलेल्या पुरुषांना इरेक्शनच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. हाय ब्लड शुगर आपल्या रक्तवाहिन्या आणि नसांवर वाईट परिणाम होतो. यासह, सेक्स ऑर्गन्ससाठी आवश्यक असलेल्या सामान्य रक्त प्रवाहावर देखील याचा परिणाम होतो. या स्थितीत महिलांना योनीमार्गात कोरडेपणा, वेदनादायक इंटरकोर्स आणि लैंगिक इच्छा नसणं जाणवतं. निरोगी आणि स्वच्छ डाएटसोबत शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणं हा या समस्येवरचा उपाय आहे.
शरीराच्या कोणत्याही भागात क्रॉनिक पेन होणं म्हणजेच तीव्र वेदना होणं हे तुमच्या सेक्शुअल डिसायरला कमी करतं. क्रॉनिक पेनपासून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीला काही काळापूर्वी हृदयविकाराचा झटका आला असेल तर त्याने काही काळ सेक्सबाबत सावध राहिलं पाहिजे.
सांधेदुखी किंवा क्रॅम्प्स तुमचं सेक्स लाईफ मोठ्यात प्रमाणात खराब करू शकतात. लैंगिक संबंधासाठी शरीराची हालचाल आवश्यक असल्याने, या आर्थरायटिसने ग्रस्त लोक लैंगिक संबंध टाळतात.