मुंबई : चहाप्रेमींची (Tea Lovers) संख्या कमी नाही. प्रत्येक नाक्यानाक्यावर-चौकात, रस्त्याच्या कडेला चहाप्रेमी (Team) झुरके घेतना दिसतील. चहाप्रेमींचा दिवसाची सुरुवात चहाने होते. काही लोक तर असे आहेत ज्यांना बेडवर टी (Bed Tea) लागते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने लोकांसाठी अनेक घातक परिणाम होऊ शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. (many disadvantages of drinking tea on an empty stomach)
पचनसंस्थेशी संबंधित कोणतीही त्रास असेल त्यांनी चहाचं सेवन कमी करावं, असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे. रिकाम्या पोटी चहा पिण्याच्या सवयीचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. यामुळे एसिडिटीची समस्या वाढू शकते. एसिडिटीचा त्रास असलेल्यांनी चहा प्यायल्यास त्याच्या आतड्यांमध्ये संसर्ग होण्याचा धोका असतो.
हृदयरोगींना चहापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. चहाच्या सेवनामुळे रक्तदाबाच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. चहाच्या सेवनामुळे रक्तदाब जास्त होऊ शकतो. त्यामुळे हृदयावर दाबही वाढतो. या काळात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो ज्यामुळे तुमचा जीवही जाऊ शकतो.
सकाळी रिकाम्या पोटी चहा तुमच्या चयापचयावर सॉफ्ट पॉइजनसारखं परिणाम करतं. यामुळे पोटातील आम्ल आणि क्षारीय संतुलन बिघडतं. परिणामी अनेक विकारांना सामोरं जावं लागू शकतं. तसेच रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तोंडाच्या आरोग्याला हानी पोहोचते, त्यामुळे तोंडातून दुर्गंधी येते.
टीप : इथं देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया आधी वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE NEWS याची पुष्टी करत नाही.