Navratri 2022 : सोमवारी 26 सप्टेंबर 2022 पासून नवरात्री सुरु होणार आहे. बंगाल (Bengal) आणि गुजरातमध्ये (Gujarat) मोठ्या उत्साहात तब्बल दोन वर्षांनी नवरात्री साजरी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या महासंकटामुळे दोन वर्ष तरुण-तरुणींना गरब्याचा (Garba 2022) आनंद घेता आला नाही. पण यावर्षी तरुणांमध्ये एक वेगळाच जल्लोष पाहिला मिळणार आहे. तर महाराष्ट्रात (Maharashtra) घरोघरी घटस्थापना (Ghatasthapana) करण्यात येणार आहे.
नवरात्र म्हटलं की अनेक जण 9 दिवस उपवास करतात. महिला असो वा पुरुष नवरात्रीचे उपवास करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील (Prime Minister Narendra Modi) नवरात्रीचे उपवास करतात. उपवास आहे म्हणून आपलं दैनदिन कामं थांबत नाही. घरातील कामं, ऑफिसचं ताण आणि बदलेलं वातावरण यामुळे उपवास करताना आपल्या अनेक आरोग्याच्या समस्या जाणवतात.
उपवासामुळे अनेकांना थकवा जाणवतो, त्याशिवाय उपवासाच्या पदार्थांमुळे अॅसिडीटी किंवा अपचन होणे यासारख्या समस्या जाणवतात. मात्र जर आपण योग्य पद्धतीने उपवास केल्यास तर आपल्याला उपवासामुळे आरोग्यास नुकसान होण्यापेक्षा फायदाच होता. प्रसिद्ध डायटीशियन शिखा अग्रवाल (Dietician Shikha Aggarwal) यांनी सांगितलेले टीप्स फ्लो केले तर तुम्ही नवरात्र छान सेलिब्रेट करु शकतात. (navratri 2022 fasting tips for good health and avoid Acidity constipation NM)
आपण उपवास केल्यामुळे आहारातील फायबरचं प्रमाण कमी होतं. तसंच या दिवसांमध्ये अनेक चहा-कॉफी घेण्यावर भर देतात. त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता होण्याची शक्यता वाढते. म्हणून अशावेळी राजगिरा पीठ, मखाणा हे पदार्थ या दिवसांमध्ये आवर्जून खा.
अनेकांना मुळात पाणी कमी पिण्याची सवय असते. साधारण तहान लागली, काही खाल्लं की किंवा तिखटं लागलं की आपण पाणी पितो. पण उपवास असल्याने आपलं खाणं कमी होतं आणि त्यातच ते पदार्थ तिखट नसतात त्यामुळे आपण साहजिकच कमी पाणी पितो. खरं तर उपवास असल्यास पाणी पिण्यावर जास्त भर दिला पाहिजे.
या 9 दिवसांच्या उपवासात फळांवर जास्त भर द्या. केळी, सफरचंद, पपई, अंजीर, पेर, चिकू या फळांचा समावेश करा. यामुळे आरोग्याला पोषण मिळण्यास मदत होते. फळांमध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात. फळांमुळे शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहण्यास मदत होते.
उपवासामुळे अनेकदा बद्धकोष्ठतेसारख्या समस्या निर्माण होतात. अशावेळी दही खाल्ल्यास पचनाशी निगडीत समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आणि तब्येत चांगली राहावी यासाठी दह्याचा फायदा होतो.
उपवासामुळे पोट रिकामं आणि त्यात उपवासाचे पदार्थांमुळे खाल्ल्यामुळे अनेकांना acidity चा त्रास होतो. अशावेळी या 9 दिवसांच्या उपवासामध्ये ताक पिण्यावर भर दिला पाहिजे.