दुधासोबत चुकूनही हे ५ पदार्थ खाऊ नको

दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. याचे फायदेही तुम्हाला माहीत आहेत. 

Updated: May 31, 2018, 01:30 PM IST
दुधासोबत चुकूनही हे ५ पदार्थ खाऊ नको title=

मुंबई : दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. याचे फायदेही तुम्हाला माहीत आहेत. आयुर्वेदात दूधाला संपूर्ण आहार म्हटले गेलेय. यातील मिनरल्स आणि व्हिटामिन आरोग्यासाठी आवश्यकत असतात. मात्र असे काही पदार्थ असतात जे दुधासोबत खाल्ले नाही पहिजेत. आयुर्वेदानुसार दुधासोबत काही पदार्थांचे सेवन करणे हानिकारक मानले जाते. 

दुधासोबत लिंबू अथवा खारट पदार्थांचे सेवन केले नाही पाहिजे. दुधासोबत या पदार्थांचे सेवन केल्यास शरीरास नुकसान होते. यामुळे स्किन इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. 

दुधासोबत मुगाच्या डाळीचे सेवन करु नये. जर तुम्ही दुधासोबत गाजर, रताळे, बटाटा, तेल, दही, नारळ, लसूण यांचे सेवन करु नये. जर तुम्हाला हे कोणतेही पदार्थ खायचे आहेत तर ते दुधाच्या सेवनाच्या दोन तास आधी खा. 

दुधासोबत आंबट पदार्थांचे सेवन करु नये. आयुर्वेदात दुधासोबत आंबट पदार्थ म्हणजे विष मानले जाते. 

गरम पदार्थांसोबत कधीही दूध पिऊ नये. मच्छीही दुधासोबत खाऊ नये. यामुळे सफेद डाग, गॅस तसेच अॅलर्जीसारख्या समस्या येऊ शकतात. मधही गरम दुधासोबत घेऊ नये.

संत्रे वा अननसाचे सेवन दुधासोबत करु नये. दुधासोबत केळे अनेकदा खाल्ले जाते मात्र हे सेवन चुकीचे आहे.