मुंबई : तुमच्या फ्रेंड्सच्या गॅंगमध्ये तुम्ही एकटेच 'सिंगल' आहात का? सध्या लग्नाचा मौसम सुरू आहे, अनेकांच्या घरात, मित्रमंडळींच्या घरात लग्नाची धामधूम सुरू आहे. मग तुमच्यासोबत साथीदार नसल्याचं तुम्हांला वाईट वाटतयं का? मग तुमचा परफेक्ट लाईफ पार्टनर शोधण्याची वेळ आली आहे. आज डिजिटल मीडियामध्येच अनेकांचा वेळ जातो, पण सोशल मीडियात 'फेक' प्रोफाईलचा धोका असल्याने अशा काही ठिकाणी तुमचा पार्टनर शोधा,जेथे तुम्हांला त्याची खरी बाजू पाहता येईल. कदाचित येथे तुम्हांला तुमच्या पसंतीनुसार साथीदार निवडता येईल.
कामाच्या ठिकाणी तुमच्या करियरच्या निगडीत आणि आवडीच्या क्षेत्रातीलच ती व्यक्ती असेल तर तुम्हांला एकमेकांसोबत बोलायला अनेक विषय मिळू शकतात. कामाचा भाग म्हणून तुम्ही भेटून वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी एकमेकांसोबत नक्कीच शेअर करू शकता. सुरूवातीच्या काळात गप्पा गोष्टींमधून तुम्हांला एकमेकांमध्ये इंटरेस्ट वाटत असेल तर ऑफिसपासून दूर भेटा, बोला. अन्यथा तुम्ही ऑफिस गॉसिपचा भाग होऊ शकता. त्याचा परिणाम तुमच्या रिलेशनशीपवर होऊ शकतो.
फीटनेस फ्रीक तरूणांसाठी जीम ही भेटण्याची उत्तम जागा आहे. जीमध्ये तरून तरूणी अनेकदा फीटनेसबाबत नव्यानव्या गोष्टींबाबत बोलत असतात. त्यामधील नवे ट्रेन्ड काय आहेत ? याकडे लक्ष देतात. फीटनेस हे तुम्हा दोघांचेही समान लक्ष्य असल्याने अनेक गोष्टींबाबत तुमची मनं जुळण्याची शक्यता अधिक असते. जीमनंतर सुरूवातीला 'त्या' व्यक्तीशी मैत्री करा आणि मग हळूहळू पुढे जा.
भारतामध्ये 'लग्न' हा एक मोठा सोहळा म्हणून सेलिब्रेट केला जातो. नातेवाईकांच्या असो किंवा कुटुंबीयांच्या एखाद्या लग्नात असो. सारेच नटून थटून येतात. त्यामुळे लग्नामध्ये तुमच्या पसंतीनुसार जोडीदार मिळण्याची शक्यता दाट असते.
पार्ट्यांचं आयोजनचं मूळी तुमचं फ्रेंड सर्कल वाढवण्यासाठी केलंलं असतं. त्यामुळे मित्र मैत्रिंणींसोबत विकेंडला बाहेर पडा. तुमचं फ्रेंड सर्कल वाढवा. यामधून तुमचे कॉन्टॅक्स वाढतील आणि कदाचित म्युचल फ्रेंडसच्या मदतीने तुम्हांला लाईफपार्टनर पसंतीनुसार मिळू शकतो.
असं म्हटलं जात की म्युझिक कॉन्सर्ट्स या मुलींना भेटण्याच्या 'फेल-प्रूफ' मेथड्सपैकी एक आहे. तुम्हा दोघांनाही सारख्या कलाकृती आवडत असतील तर तुम्हांला गप्पा मारायला अनेक गोष्टी, विषय समान मिळू शकतात.