मुंबई : सकाळचा नाश्ता हा महत्त्वाचा मानला जातो. सकाळचा नाश्ता पोटभर असावा. भारतात अनेक ठिकाणी सकाळी नाश्त्याला पोहे खाल्ले जाते. हा नाश्ता पोटभरीचा मानला जातो. जे लोक डाएटिंग करत आहेत त्यांच्यासाठी पोहे खाणे फायदेशीर असते. हे खाल्ल्याने पोटाची ढेरी वाढत नाही. पोह्यामध्ये आवश्यक असलेली व्हिटामिन्स, मिनरल आणि अँटी ऑक्सिडंट असतात. पोह्यामध्ये तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या भाज्या टाकून ते आणखी पौष्टिक बनवू शकता. नाश्त्यामध्ये पोह्याचे सेवन केल्याने शरीर स्वास्थ चांगले राहते. शरीलाला एनर्जी मिळते. मधुमेह दूर होतो.
सकाळचा नाश्ता हा आरोग्यदायी हवा आणि यासाठी चांगला पर्याय म्हणजे पोहे. हे खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर काम करण्यासाठी एनर्जी मिळते. इतकंच नव्हे तर पोहे तुम्ही लंच टाईममध्येही खाऊ शकता.
तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर पोहे खाल्ल्याने ती दूर होते. पोह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. गर्भवती महिलांनी तसेच लहान मुलांनी पोहे खाल्ले पाहिजे ज्यामुळे त्यांना हिमोग्लोबिन मिळेल.
पोह्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात यामुळे पोह्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. शरीराला दिवसभर कार्बोहायड्रेट्सची गरज असते. पोह्याचे सेवन केल्यास दिवसभराची कार्बोहायड्रेट्सची गरज भागली जाते.
ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी पोह्याचे सेवन फायदेशीर ठरते. पोहे खाल्ल्याने बराच वेळ पोट भरलेले राहते. यामुळे बीपीही कंट्रोलमध्ये राहतो.
पोहे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढत नाही. कारण एक वाटी पोह्यामध्ये कमीत कमी २५० कॅलरीज असतात. यासोबतच यात गरजेचे व्हिटामिन, मिनरल आणि अँटी ऑक्सिडंट असतात.