कौतुकास्पद! वाढदिवसाच्या दिवशी अभिनेत्री रिंकू राजगूरूने ३०० कुटूंबांना दिलं हे गिफ्ट

रिंकूने सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.

Updated: Jun 4, 2021, 08:08 PM IST
कौतुकास्पद! वाढदिवसाच्या दिवशी अभिनेत्री रिंकू राजगूरूने ३०० कुटूंबांना दिलं हे गिफ्ट title=

मुंबई : सैराट फेम रिंकू राजगूरुने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला आहे. 3 जून रोजी रिंकूने आपला 20वा वाढदिवस साजरा केला आहे. रिंकूचा सध्या कोरोनाच्या कठीण परिस्थितीत रिंकूने सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रिंकूचा हा वाढदिवस केवळ तिच्याच नाही तर अनेक कुटुबांच्या लक्षात राहणार आहे. 

वाढदिवसाच्या दिवशी रिंकूने 300 कुटुंबियांना नेब्युलायझरचं वाटप केलं आहे. जिल्हा परिषदेतील शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना नेब्युलायझरचं वाटप करण्यात आलं आहे. वाढदिवसाच्या दिवशी घेतलेल्या या आदर्श निर्णयामुळे रिंकूचं संपूर्ण स्तरावरून कौतुक केलं जातंय.

सोलापूरातील महागुंळ परिसरातील मायनर, मुंडफणेवाडी, भोसलेवस्ती, काळेवस्ती, घारमाळकरगट, लाटेवस्ती तसंच श्रीपूर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना नेब्युलायझरचं वाटप करण्यात आलं आहे. रिकूंच्या या उत्तम निर्णयाला तिच्या आई-वडिलांनी देखील साथ दिली आहे. 

नेब्युलायझर म्हणजे नेमकं काय? आणि त्याचा वापर कसा करतात?

नेब्युलायझर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. ज्या व्यक्तींना अस्थमाचा त्रास किंवा श्वसनासंदर्भातील कोणती समस्या असते, अशा व्यक्तींना नेब्युलाझरची गरज भासते. नेब्युलायझर द्रव पदार्थाच्या औषधाला बारीक धुके तयार करते. हे तयार झालेले बारीक धुके रूग्ण मास्कवाटे शरीरात घेतो. या पद्धतीने औषध घेतल्याने ते फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.