Rarest blood type golden blood group: तुम्ही कधी रक्तदान केलंय का? रक्तदानाची (Blood Donation) व्याख्याच महादानाशी संबंधित आहे. या एका दानानं तुम्ही कोणाचातरी जीव वाचवता, ही भावनाच किती सुखावणारी आहे. म्हणूनच म्हणतात, की जीवनात एकदातरी रक्तदान करावं. तुम्हाला माहितीये का, मानवी शरीरात रक्त जरी एका रंगाचं असलं तरीही ते एकाच प्रकारचं नसतं. आतापर्यंत आपण ऐकलं असेल की सहसा मानवी रक्ताची विभागणी A+, A-, B+, B-, O+, O-, AB+, AB- या गटांमध्ये (Blood Group) केलेली असते. पण, आता यात आणखी एका रक्तगटाची भर पडली आहे. शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांच्या मते हा जगातील अत्यंत दुर्मिळ रक्तगट असून त्याचा उल्लेख Rarest Blood Group म्हणून करण्यात आला आहे.
सायंन्स म्युझियम ग्रुपमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालुसार प्राचीन ग्रीसमध्ये अशी धारणा होती, की देवतांच्या शरीरात सोनेरी रक्त वाहतं. थोडक्यात सोन्याचं रक्त (Golden Blood). इकर, असा त्याचा उल्लेख होत होता. हा द्रव त्यांना अजरामर ठेवू शकत होता. पण, सर्वसामान्य व्यक्तींच्या शरीरात मात्र हा द्रव विषारी समजला जात होता.
1961 मध्ये पहिल्यांदाच गोल्डन ब्लड, अर्थात सोनेरी रक्तगट असणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला. अतिशय दुर्मिळ असल्यामुळं या रक्तगटाला Golden Blood Group चं नाव देण्यात आलं. बराच काळ हे संशोधन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू दिलं नव्हतं. पण, आता जेव्हा संपूर्ण जगासमोर या रक्तगटाची माहिती पोहोचली आहे, तेव्हा अनेकांचेच डोळे विस्फारत आहेत.
सदर रक्तगटाचं वैज्ञानिक नाव Rhnull आहे. संयुक्त राष्ट्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जगाची लोकसंख्या 8 अब्ज इतकी झाली असली तरीही अवघ्या 45 व्यक्तींमध्ये हा रक्तगट आढळून येतो. ढळून येतो.
मानवामध्ये हा रक्तगट अजरामर होण्याची ताकद देत नसला तरीही त्याच्या प्रत्येक थेंबात असणारे जीवन रक्षक गुण अद्वितीय आहेत. कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीच्या शरीरात गरज भासल्यास गोल्डन ब्लड देता येतं. सध्याच्या घडीला जगात 45 व्यक्तींमध्ये हा रक्तगट असला, तरीही त्यातूनही 9 व्यक्तीच रक्तदान करण्यास समर्थ आहेत.
सहसा रुग्णालयांमध्ये गरज भासल्यास रक्तपेढीतून रक्त घेतलं जातं. पण, गोल्डन ब्लड ग्रुपची गरज पाहता या रक्तगटासाठी गडगंज किंमत मोजणारेही कमी नाहीत. अगदी एक ग्राम सोन्याहूनही या रक्ताची किंमत जास्त आहे.
जेनेटीक म्युटेशन अर्थात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा रक्तगट जाऊ शकतो. किंवा चुलत भावंड किंवा तत्सम नात्यांमध्ये लग्न झाल्यास हा रक्तगट पुढे जातो. पण, या रक्तगटाच्या व्यक्तींमध्ये anemia चा धोका संभवतो. सुरक्षेच्य कारणास्तव या मंडळींची ओळख जाहीरही केली जात नाही.