Fat Loss Journey : नवीन वर्ष जवळ आलंय. अनेक लोकं वजन कमी करण्याचा संकल्प करतात. अशावेळी नेमकं काय करावं? हा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी आपण रिअल वेट लॉस केलेल्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊ शकता. श्रुती सिंग नावाच्या महिलेने तिचा वजन कमी करण्याचा प्रवास शेअर केला आणि शारीरिक व्यायामासोबतच तिने फॉलो केलेल्या भारतीय आहार योजनेचाही खुलासा केला.
श्रुतीने सांगितले की, 87 किलोवरून 55 किलोपर्यंत जाण्यासाठी तिला 12 महिने लागले. तिने पुढे सांगितले की, वजन कमी करण्यासाठी ट्रेनरचा डाएट फॉलो केला. वेळोवेळी, परिणाम पाहता, तिने कॅलरीज वाढवल्या आणि कमी केल्या.
तिच्या वर्कआऊट प्लॅनबद्दल बोलताना श्रुती म्हणाली, “जेव्हा मी फिटनेसचा प्रवास सुरू केला, तेव्हा कोविड लॉकडाऊन चालू होते, त्यामुळे मी ना जिममध्ये जाऊ शकले, ना धावणे किंवा चालणे. म्हणूनच मी घरगुती व्यायाम सुरू केला. मी जवळपास 1 तास घरीच व्यायाम करायचे आणि घरीच चालत पायऱ्या पूर्ण करायचे. यानंतर, जेव्हा लॉकडाउन उघडले, तेव्हा मी क्रॉसफिट क्लास सुरू केला आणि तेथे सुमारे 1 तास वर्कआउट करायचे. वर्कआउट्समध्ये पॉवर ट्रेनिंग, फंक्शनल ट्रेनिंग, बॉडी वेट ट्रेनिंग आणि उच्च-तीव्रता व्यायाम यांचा समावेश होता.
श्रुती सिंगने आपल्या इन्स्टाग्रामवर तिचा डाएट प्लान शेअर केलाय.
वजन कमी करणारा नाश्ता
5 ग्रॅम खोबरेल तेल
1 संपूर्ण अंडे
4 अंडी पांढरे
1 तुकडा चीज स्लाईस
1 स्कूप व्हे प्रोटीन
1 ब्रेड
५ ग्रॅम तूप
10 ग्रॅम खोबरेल तेल
150 ग्रॅम भाज्या
150 ग्रॅम चिकन ब्रेस्ट
100 ग्रॅम बटाटा
५० ग्रॅम मैदा
150 ग्रॅम बेरी
ब्रेडचे 2 तुकडे
15 ग्रॅम पीनट बटर
10 ग्रॅम खोबरेल तेल
150 ग्रॅम चिकन ब्रेस्ट
100 ग्रॅम बटाटा
200 ग्रॅम भाज्या
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)