Smoking Effect on pregnant women : हल्ली तरुणांसोबत तरुणींमध्येही स्मोकींगचं फॅड भलतचं वाढल आहे. कुल दिसण्यासाठी किंवा तणाव घालवण्यासाठी धुम्रपान केलं जातंय. मात्र तरूणींसाठी हे अत्यंत धोकादायक ठरु शकतो. धुम्रपानाच्या सवयीमुळे महिलां तर धोका आहेच, पण होणाऱ्या बाळालाही धोका आहे. धुम्रपानाचे अनेक गंभीर परिणाम होतात.
सध्या कॉलेजच्या परिसरात चहा टपऱ्यांवर वा कॉर्पोरेट कार्यालयांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात तरुणी सिगारेट ओढताना दिसतात. दिवसाढवळ्या उघडपणे पान टपऱ्या आणि वाईन शॉपवर आता तरुणींचीही गर्दी पाहायला मिळतेय. विशेषता कॉर्पोरेट क्षेत्रात वाढत्या ताण-तणावांमुळे सिगारेट ओढण्याचे प्रमाण वाढलं आहे. यामुळे तरूणींना गर्भधारणेला अडचण होऊ शकते, आणि जन्माला येणार्या बाळाला हदयविकाराचा धोका संभवतो.
गर्भवती महिलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम
सिगारेट ओढल्याने तुमच्या बाळापर्यंत जाणारं ऑक्सिजन आणि पोषक घटकांचे प्रमाण कमी होतं. गर्भपातासह गर्भधारणेत गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो. गर्भावस्थेत बाळाला श्वास घेण्याच्या अडचणी निर्माण होतात. प्रसुतीदरम्यान महिलांना धोका पोहोचू शकतो. लहान बाळांचा गर्भामध्येच मृत्यू होण्याची शक्यता असते. जन्मजात बाळाला हृदयविकाराचा आजार होऊ शकतो. जन्माला येणारा प्रत्येक जीव आपल्या आई-वडिलांचं एक सूक्ष्म रूप घेऊन तयार होतो. त्यांच्या व्यसनांसह इतर शारीरिक व्याधींचाही परिणाम येणाऱ्या पिढीवर होत असतो.. त्यामुळे व्यसनांमुळे केवळ आपलंच नाही तर आपल्या येणा-या पीढीलाही धोक आहे...म्हणून आता सिगारेटचा झुरका मारण्याआधी जरूर विचार करा.