स्मरणशक्ती वाढवण्याचे ५ आश्चर्यकारक उपाय!

 बदलत्या जीवनशैलीमुळे ताण-तणाव, नैराश्य यांसारख्या समस्या उद्भवतात. 

Updated: Jul 3, 2018, 01:44 PM IST
स्मरणशक्ती वाढवण्याचे ५ आश्चर्यकारक उपाय! title=

मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे ताण-तणाव, नैराश्य यांसारख्या समस्या उद्भवतात. त्याचबरोबर स्मरणशक्ती कमजोर होण्याची समस्याही निर्माण झाली आहे. जीवनशैलीत काही बदल केल्यास या समस्या दूर होऊ शकतात. जाणून घ्या स्मरणशक्ती वाढवण्याचे काही सोपे उपाय...

मेहंदी 

स्मरणशक्ती कमजोर होत असल्यास मेहंदीचा लेप डोक्याला लावा. मेहंदीत करनोसिक तत्त्व असते. ज्यामुळे मेंदूच्या पेशी सक्रिय होण्यास मदत होते.

सकाळी लवकर उठणे

सकळी लवकर उठण्याचे इतर अनेक फायदे आहेत. पण सकाळी लवकर उठून मोकळ्या वातावरणात फिरल्यास स्मरणशक्ती मजबूत होण्यास मदत होईल. रोज सकाळी लवकर उठून हिरवळीवर चालल्यास दृष्टी सुधारण्यास मदत होते.

डाळींब आणि सफरचंदाचे सेवन

फळात अॅँटीऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे मेंदू सक्रीय राहण्यास मदत होते. यामुळे मेंदू सतेज ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी डाळींब आणि सफरचंदाचे सेवन करणे गरजेचे आहे.

अक्रोड

मेंदू सतेज ठेवण्यासाठी रोज एक अक्रोड खाणे गरजेचे आहे. यात व्हिटॉमिन ए आणि अॅँटीऑक्सीडेंट्स असतात. ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते.

ग्रीन टी

मानसिक शांतीसाठी चहा, कॉफी ऐवजी ग्रीन टी घेणे फायदेशीर ठरेल. ग्रीन टी मुळे मेंदू रिलॉक्स होतो.