Onion Colours : प्रत्येक घरातील स्वयंपाक घरात असणारा पदार्थ म्हणजे कांदा बटाटा..कांद्याशिवाय कुठलाही पदार्थ हा अपूर्णच...नॉनव्हेज म्हटलं की सोबत ताटात कांदा हवा. अनेक पदार्थांवरून बारीक कांदा चिरून वरुन घालून खातात. अगदी अनेकांना कांद्याची कोशिंबीर खूप आवडते. पण तुम्हाला कोणी विचारलं की चांगला कांदा कसा निवडायचा किंवा चांगला कांदा कुठला तर या प्रश्नाचं उत्तरं अनेकांना माहिती नाही. चला तर आज आपण कांद्याबद्दल सगळं जाणून घेऊयात.
बाजारात आपल्या नजरेत लाल आणि पांढरा कांदा आढळतो. पांढरा कांदा हा विदर्भात आणि कोकणात मिळतो. तर लाल कांदा हा चवीला जरा तिखट असतो. तुम्हाला माहिती आहे का कांद्याचे 6 प्रकार आहेत. या प्रकारांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Trending News Types of Onion uses for cooking and Onion Benefits Side Effects onion fact)
नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. लाल कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. या कांदा सामान्य कांद्यापेक्षा जरा मोठा असतो आणि त्याची चव तीक्ष्ण असते. हा कांदा चिरताना आणि सोलताना डोळ्यांमध्ये जळजळ होते. या कांद्याची पेस्ट ग्रेव्ही करण्यासाठी उत्तम.
वापर - कांदा डिप्स, सँडविच आणि सॅलडसाठी चांगला
हा कांदा चवीला गोड असून तो जरा हलक्या सोनेरी रंगाचा असतो. या कांद्यामध्ये इतर कांद्यांप्रमाणे तिखटपणा नसतो.
वापर - भज्जी बविण्यासाठी बेस्ट
हा कांदा इतर कांद्यापेक्षा स्वस्त असतो. जर तुम्हाला खाण्यासाठी कुठला कांदा विकत घ्या असं वाटतं असेल तर हा कांदा एकदम परफेक्ट. या कांद्याची चव तिखट असते. इतर कांद्यापेक्षा या कांद्यात सल्फरचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तो कच्चा खाणे कठीण होतं. शिवाय हा कांदा बराच काळ टिकतो.
वापर - ब्रेजिंग म्हणजे दमवाले व्यंजनांसाठी वापर. याशिवाय रोस्टिंग, सूप आणि स्टूसाठीही उपयुक्त
पांढरा कांदा हा कमी प्रमाणात आढळतो. पांढरा कांदा पिवळ्या कांद्याच्या तुलनेत तिखट, कुरकुरीत आणि स्वच्छ असतो. हा कांदा लवकर खराब होतो. हा कांदा कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये.
वापर - साल्सा,चटणी, पास्ता सॉस आणि व्हाईट सॉससाठी चांगला
याला कांद्याच्या श्रेणीमध्ये मोजलं जाऊ शकतं नाही. पण हा देखील कांद्याचा एक प्रकार आहे. हा एक जंगली कांदा असून याची चव लसणासारखी असते. मोठ्या मोठ्या शेफला हा कांदा वापरायला आवडतो. हा कांदा आकाराने खूप लहान असते.
वापर - पदार्थाची चव वाढविण्यासाठी उपयोग, शिवाय हा कांदा रोस्ट करुन पण खातात.
हा हिरवा कांदा पण असतो. हा कांदा हिवाळ्यात खूप खाल्ला जातो. त्याला आलेवादी कांदा असंही म्हणतात.
वापर - सॅलड, सूप आणि पॅनकेकसाठी बेस्ट
बाजारातून कांदा खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. कांदा हा पक्का असावा शिवाय तो मऊ आणि डाग नसलेला असावा. कांद्याची बाहेरची त्वचा कोरडी नसावी. तसंच ते आपल्या हातात जड वाटले पाहिजे आणि कांद्याचा वास नसावा.
कांदे हे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. तर कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी साठवावे. पण जर तुम्ही एकदा कांदा कापला किंवा सोलून घेतला की तुम्ही तो रेफ्रिजरेटरमध्ये 7-10 दिवस ठेवू शकता. पण त्यांना बटाट्यांपासून दूर ठेवा, कारण त्यामुळे कांद्याला कोंब फुटतात.
कांद्याचा तुमच्या आरोग्यास खूप फायदा होतो. कांद्या खाल्ल्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. शिवाय सूज कमी करण्यास, ऍलर्जीची लक्षणे कमी करण्यास, रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. कांदे व्हिटॅमिन सी, बी जीवनसत्त्वे आणि पोटॅशियमचा समृद्ध स्रोत आहेत. तसंच यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. कांद्यामध्ये असलेले उच्च अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. एवढंच नाही तर कांदा तुम्हाला अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील प्रदान करू शकतो.
आहार तज्ज्ञ असंही सांगतात की, कांद्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येतं. जेणेकरून मधुमेह आणि प्रीडायबिटीज असलेल्या लोकांसाठी देखील ते खूप फायदेशीर आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)