Weight According Height: सध्याच्या घडीला फीट (Fit) आणि निरोगी राहणं हे एक आपल्यासाठी मोठं आव्हान बनलं आहे. आजकालच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) सर्वांचा एकच प्रश्न असतो, तो म्हणजे वजनात होणारी वाढ (Weight gain). अयोग्य आहार (Wrong Diet) आणि बदलती जीवनशैली यामुळे लठ्ठपणाची समस्या काही आपली पाठ सोडत नाही. अनेकदा पुरुषांच्या तुलनेत महिलांना वजनाची समस्या अधिक भेडसावते.
वजन कमी करण्यासाठी महिला अनेक टिप्सचाही वापर करतात. महिलांची कंबर, हिप्स आणि पोटाची चरबी वाढली की त्यांना ते आवडत नाही. बर्याच वेळा महिला हेवी वर्कआउट आणि डाएट कंट्रोल या माध्यमातून वजन कमी करतात. पण फार कमी लोकांना माहिती असतं की, उंचीनुसार त्यांचं किती वजन असलं पाहिजे (Weight According Height).
आपल्यासाठी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, निरोगी व्यक्तीचं वजन, वय आणि उंची किती असावी. तज्ज्ञांच्या मते, उंचीनुसार वजनाचा समतोल हा उत्तम आरोग्याचा निकष आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असावं याबाबत माहिती देणार आहोत.