Cholesterol Level : तुमच्या वयानुसार किती असावी कोलेस्ट्रॉलची पातळी? ह्रदयासाठी 'इतकं' प्रमाण धोकादायक

Cholesterol Level by Age : हाय कोलेस्ट्रॉलमुळे ह्रदयविकार आणि हार्ट अॅटॅकची जोखीम वाढू शकते. जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल करुन कोलेस्ट्रॉल मॅनेज करु शकता. वयानुसार जाणून घ्या कोलेस्ट्रॉलची किती पातळी असावी? 

श्वेता चव्हाण | Updated: Jun 26, 2023, 10:13 AM IST
Cholesterol Level : तुमच्या वयानुसार किती असावी कोलेस्ट्रॉलची पातळी? ह्रदयासाठी 'इतकं' प्रमाण धोकादायक title=
Cholesterol Level by Age

Cholesterol Level by Age News In Marathi : आजकाल कोलेस्टेरॉल (Cholesterol) हा शब्द सतत ऐकायला मिळत आहे. जो शब्द फक्त तज्ज्ञांनाच माहीत असायचा, मात्र आता सर्वसामान्य माणसालाही माहित झाल्यामुळे हा फरत झाला आहे. वजन वाढणे, मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजारांची चिंता असताना त्यात आता कोलेस्ट्रॉलची भर पडली आहे. कोलेस्टेरॉलबद्दल (Cholesterol) जेवढी उत्सुकता, भीती आणि गैरसमज आहेत, तेवढे इतर कशाबद्दलही नसतील. कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ खाल्ल्याने खरोखरच हृदयविकार जडतो का? कोलेस्टेरॉलयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने रक्तातील कोलेस्टेरॉल वाढते का? असे अनेक प्रश्न आणि शंका सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होतात. चला तर मग जाणून घेऊया, तुमच्या वयानुसार शरीरातील कोलेस्ट्ऱॉल लेवल (Cholesterol Level by Age) किती असलं पाहिजे. 

कोलेस्टेरॉल हा चरबीचा एक प्रकार असून ज्याला लिपोप्रोटीन (lipoprotein) म्हणतात. लिपोप्रोटीनचे दोन प्रकार आहे, कमी घनता लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल (एलडीएल) आणि उच्च घनता लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल (एचडीएल) आहेत. शरीरात HDL चे प्रमाण वाढणे चांगले मानले जाते, तर दुसरीकडे LDL चे प्रमाण वाढणे आपल्या शरीरासाठी खूप वाईट मानले जाते. LDL हे आपल्या शरीरासाठी वाईट कोलेस्टेरॉल (bad cholesterol) मानले जाते. जेव्हा एलडीएल जास्त असते तेव्हा ते रक्ताच्या धमन्यांमध्ये जमा होऊ लागते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

कोलेस्टेरॉल केव्हा धोकादायक का बनते?

सामान्य व्यक्तीमध्ये 240 किंवा त्याहून अधिक कोलेस्टेरॉलची पातळी अत्यंत धोकादायक मानली जाते. जर चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच एचडीएल पुरुषांमध्ये 40 पेक्षा कमी आणि महिलांमध्ये 50 पेक्षा कमी असेल तर खूप धोकादायक लक्षणे असू शकतात. 

वयानुसार कोलेस्टेरॉलची पातळी

19 वर्षे किंवा त्याहून अधिक

एकूण कोलेस्टेरॉल - 170 - 200 mg/dl

HDL नसलेले - 130 mg/dl पेक्षा कमी

LDL - 100 mg/dl पेक्षा कमी

HDL - 45 mg/dl पेक्षा जास्त

20 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिला

एकूण कोलेस्टेरॉल - 125 - 200 mg/dl

HDL नसलेले - 130 mg/dl पेक्षा कमी

LDL - 100 mg/dl पेक्षा कमी

HDL - 50 mg/dl किंवा अधिक

पुरुष 20 वर्षे किंवा त्याहून अधिक

एकूण कोलेस्टेरॉल - 125 - 200 mg/dl

HDL नसलेले - 130 mg/dl पेक्षा कमी

LDL - 100 mg/dl पेक्षा कमी

HDL - 40 mg/dl किंवा त्याहून अधिक 

 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)