सकाळी किती वाजेपर्यंत Breakfast करणं आरोग्यासाठी फायद्याचं? ही वेळ अजिबात चुकवू नका

Health News : सकाळच्या वेळी अनेकजण घाईत असल्यामुळं Breakfast करणं टाळतात. पण, ही सवय त्यांना धोक्यात आणू शकते. का? ते नक्की वाचा... कारण आरोग्याची हेळसांड न केलेलीच बरी.   

सायली पाटील | Updated: Aug 9, 2023, 08:06 AM IST
सकाळी किती वाजेपर्यंत Breakfast करणं आरोग्यासाठी फायद्याचं? ही वेळ अजिबात चुकवू नका  title=
what is the right time of breakfast health news

Health News : मागील काही वर्षांमध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात आजारपणाचा शिकार होताना दिसत आहे. (body pain) अंगदुखी, स्ट्रेस इटिंग अर्थात तणावाच्या वेळी ताबा न ठेवता खात राहणं, बाहेरील खाद्यपदार्थांवर भर अशी त्यांच्या आयुष्याची घडी विस्कटलेलीच दिसते. ही घडी व्यवस्थित करण्याचं भान तेव्हा येतं जेव्हा शरीरच तुम्हाला उत्तर देत धक्का देतं. पण, ही वेळ येतेच का? यासाठी आपल्याच काही सवयी कारणीभूत आहेत, का? विचार करा... 

सकाळी उठल्या क्षणापासून आपण घड्याळाच्या काट्यानुसार धावत असतो. पण, या साऱ्यामध्ये काही गोष्टी निसटून जातात आणि नकळतच त्याचे दीर्घ परिणाम आपल्याला दिसून येतात. यातचील एक नकळत निसटणारी बाब म्हणजे Breakfast अर्थात न्याहारी. 

घरातील मोठ्यांपासून डॉक्टर, आहारतज्ज्ञांपर्यंत सर्वजण Breakfast नक्की केला पाहिले असं त्यांच्यात्यांच्या परिनं आपल्याला सांगूनही एकतर आपण तो कोणत्याही वेळी करतो किंवा मग तो विसरूनच जातो. पण, एक बाब कायम लक्षात ठेवा की रात्रीच्या झोपेनंतर तुमच्या आहारात मोठी विश्रांती येते आणि Breakfast तुमच्या दिवसातील आहारातील पहिला टप्पा असतो. त्यामुळं तो पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असणं गरजेचं आहे. ज्यामध्ये प्रथिनं, हेल्दी फॅट, फळांचे रस असं सर्वकाही असणं गरजेचं आहे. 

योग्य Breakfast केल्यामुळं तुमचं मेटाबॉलिज्म संतुलित राहतं. रक्तातील साखरेचं प्रमाणही नियंत्रणात राहतं. इतकंच नव्हे, तर दिवसभराच्या कामासाठी तुम्हाला ताकद मिळते. ब्रेकफास्ट केल्यामुळं तुम्हाला कोणा एका कामावर एकाग्रता टिकवून ठेवता येते. इतकंच नव्हे, तर वजन नियंत्रणात ठेवण्यातही या सवयीची फार मदत होते. 

रात्रीच्या जेवणात आणि ब्रेकफास्टमध्ये नेमकं किती अंतर असावं? 

आदल्या रात्री किंवा संध्याकाळी तुम्ही 12 तासांपूर्वी दिवसातील शेवटचं अन्नग्रहण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या विश्रांतीनंतर ब्रेकफास्ट करावा.  थोडक्यात रात्रीचं जेवण आणि सकाळचा ब्रेकफास्ट यामध्ये किमान 12 तासांचं अंतर असावं. ही वेळ शरीरासाठी फायद्याची ठरते, एक प्रकारे आपल्या पचनसंस्थेला आरामही मिळतो. रात्रीचं जेवण आणि ब्रेकफास्ट यांच्यामध्ये असणारं वेळेचं अंतर नेमकं किती वाढवावं हे तुमच्या शरीरावर आधारित असतं. पण, हा फरक शरीराला त्रासदायक ठरणार नाही याची काळजी घ्या. उदाहरणार्थ तुम्ही रात्री 8 वाजता जेवण करत असाल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास तुम्ही ब्रेकफास्ट करायचा हरकत नाही. 

हेसुद्धा वाचा : Dry Fruits Benefits : कोणते ड्रायफ्रुट्स भिजवून खावेत आणि कोणते खाऊ नये? तज्ज्ञ काय सांगतात

 

ब्रेकफास्टमध्ये असावेत 'हे' पदार्थ...

एका संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार ब्रेकफास्ट न केल्यास हृदयविकारांचा धोका संभवतो. अनेकदा परिस्थिती आणखीही बिघडू शकते. हो, पण ब्रेकफास्ट करणं म्हणजे काहीही खाणं असाही अर्थ इथं होत नाही. आरोग्यदायी ब्रेकफास्टमध्ये अंड, पनीर, टोस्ट, फळं, दलिया, लापसी, दूध, बदाम अशा पदार्थांचा समावेश असावा. किंवा डोसा, सांबर, खोबऱ्याची चटणी असा पौष्टीक ब्रेकफास्टही तुम्ही करू शकता. 

एक लक्षात घ्या, की कोणत्याही वेळी ब्रेकफास्ट करणं टाळा. अशानं तुमची चयापचय संस्था बिघडते आणि यामुळं शरीरातील ग्लुकोजची पातळी बिघडते. परिणामी टाइप 2 मधुमेह, स्थुलता आणि डिस्लिपिडेमिया यांसारख्या व्याधींचा धोका बळावतो. त्यामुळं योग्य वेळी आणि योग्य तोच ब्रेकफास्ट करा आणि आरोग्याची काळजी घ्या!