मुंबई : लहान मुलं सगळ्यांनाच आवडतात, ते फार निरागस असतात. त्याचं वागणं, हसणं आपल्याला फारच मोहित करतं आणि आपण त्यांच्या सगळ्या गोष्टी कुतुहलाने पाहात असतो. तुम्हाला हे देखील माहित असेल की, लहान मुलं ही सारखी झोपतात. त्यावेळी तुम्ही त्यांना हळूच हसताना देखील पाहिलं असेल. पण मग ते झोपेत का हसतात? असा तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? त्यांना स्वप्न पडत असावं किंवा त्यांना एखादी गोष्ट आठवत असावी का? नेमकं यामागे काय कारण असू शकतं? चला जाणून घेऊ.
नवजात मुलांसाठी झोपेत हसणं खूप सामान्य आहे. काही अभ्यासानुसार, असे म्हटले जाते की, मुलाचं हसणं हे चांगल्या भावनांचे लक्षण आहे, तर अभ्यासानुसार असे म्हटले जाते की, लहान मुलांचं हसणे हे एक एक्सप्रेशन नव्हे तर एक रिफ्लेक्स आहे.
नवजात बालके कोणत्याही बाह्य उत्तेजनामुळे हसत नाहीत, मेंदूच्या विशिष्ट हालचालीमुळे ते झोपेत हसतात. जलद डोळ्यांची हालचाल (REM) स्वप्नांना कारणीभूत ठरते आणि त्यांच्या स्वप्नांना प्रतिसाद म्हणून मुले हसतात.
मानवामध्ये झोपेचे दोन प्रकार आहेत - एक म्हणजे आरईएम (रॅपिड आय मूव्हमेंट) आणि दुसरे एनआरईएम (नॉन-रॅपिड आय मूव्हमेंट). शरीर दररोज रात्री या टप्प्यांतून जात असते, ज्यामुळे तुम्हाला हळूहळू झोप येऊ लागते.
NREM टप्पा हा झोपेचा पहिला टप्पा आहे, ज्यामध्ये शरीर आराम करण्यास सुरवात करते. ज्यामुळे तुमचा श्वास मंद होतो आणि हळूहळू व्यक्ती झोपेत जाते.
दुसऱ्या टप्प्यात, श्वासोच्छ्वास, नाडीचा वेग आणि तुमचे स्नायू शिथिल होतात. यासोबतच तुमच्या मेंदूतील क्रिया आणि मेंदूच्या लहरीही कमी होऊ लागतात.
यानंतर REM टप्पा सुरू होतो. जे सुमारे एक ते अर्ध्या तासाच्या झोपेनंतर होते. तेव्हाच तुम्ही स्वप्नं पाहू लागता. या अवस्थेत पापण्या हलू लागतात, मेंदू आणि हृदयाचे ठोके वाढतात, परंतु यावेळी तुमचे हात पाय हलत नाहीत. त्यामुळेच आपल्याला देखील बऱ्याचदा वाटते की, आपण समोरच्याला बोलवण्याचा प्रयत्न करतो, परंतु बोलवले जात नाही... त्यामागचं कारण हेच आहे.
संशोधनानुसार, नवजात मुलांमध्ये हे झोपेचे चक्र REM अवस्थेपासून सुरू होते. लहान मुले सहसा दिवसातून 16 ते 18 तास झोपतात. कारण त्यांच्याकडे झोपेचे-जागण्याचे चक्र नसल्यामुळे आणि नवजात बालकांना अधिक REM झोपेचा अनुभव येत असल्याने, त्यांच्यासोबत असं घडतं.
याशिवाय, नवजात मुलांमध्ये भावनांचा विकास होतो जसे की जेव्हा बाळ झोपेतून उठते तेव्हा बाळ नवीन आवाज ऐकते आणि अनेक गोष्टी पाहते. म्हणून, मुलाच्या आजूबाजूला जे काही घडते, ती माहिती मेंदूमध्ये रेकॉर्ड केली जाऊ शकते, जी झोपेच्या दरम्यान प्रक्रिया सुरू करते. अशा भावना निर्माण झाल्या तरी मुलं हसतात.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल परंतु लहान मुलं झोपेत गॅस गेल्यावरही हसतात. कारण गॅस गेल्यानंतर त्यांना आराम मिळतो आणि बरं वाटतं.