Yoga Poses : पचन संदर्भातील तक्रारींपासून दूर राहण्यासाठी योगासन

जाणून घेऊया पचन संदर्भातील तक्रारींसाठी कोणती योगासनं फायदेशीर ठरू शकतात. 

Updated: Jun 4, 2021, 02:26 PM IST
Yoga Poses : पचन संदर्भातील तक्रारींपासून दूर राहण्यासाठी योगासन title=

मुंबई : योगा केल्याने शारीरिक आरोग्याला बरेच फायदे मिळतात. ब्लड प्रेशर कमी करण्यापासून ते पीसीओएसच्या लक्षणांपासून आराम देण्यासाठी योगा फार फायदेशीर ठरतं. अनेकदा औषधांमुळे किंवा अधिक जेवणाने पोटाला त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी योगाभ्यासाद्वारे ही समस्या कमी होण्यास मदत होते. तर आज जाणून घेऊया पचन संदर्भातील तक्रारींसाठी कोणती योगासनं फायदेशीर ठरू शकतात. 

आनंद बालासन (हॅप्पी बेबी पोज)

तुमच्या पाठीवर आरामात झोपा. गुडघ्यातून पाय दुमडून त्यांना छातीजवळ घ्या
पायांचे पंजे हाताने पकडा
अशाच स्थितीमध्ये 20-30 सेकंद रहा
2-4 वेळा हे आसन करा. आसन करताना श्वासाची गती सामान्य राहूदे
यानंतर सामान्य स्थितीत पुन्हा या

पद्मासन

क्रॉस लेग्ज स्थितीमध्ये चटईवर बसा आणि पाठ सरळ ठेवा
हातांच्या ज्ञान मुद्रा करून हात गुडघ्यांवर ठेवा.
या मुद्रेत असताना श्वास घ्या आणि सोडा. 

शलभासन

एका चटईवर पोटाच्या भागावर झोपा. यावेळी झोपताना तुमची पाठ वरील बाजूला आणि पोट खालील बाजूला असेल
तुमच्या पायांना सरळ ठेवा. पायांचे पंजे सरळ आणि वरील बाजूला असले पाहिजेत. दोन्ही हातांना सरळ ठेवून त्यांना मांडीखाली दाबून धरा
तुमचं डोकं आणि चेहरा सरळ ठेवा. त्यानंतर एक दीर्घ श्वास आत घ्या.
दोन्ही पायांना वर उचलण्याचा प्रयत्न करा. पायांना शक्य तितक्या वरील बाजूला घेऊन जा.
20 सेकंद या मुद्रेमध्ये रहा. 
यानंतर श्वास सोडत पाय हळूहळू खाली घ्या

बालासन

हे आसन करण्यासाठी गुडघ्यावर बसा
तुमच्या पायांना बोटांना एकत्र ठेवा आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडं अंतर ठेवा.
श्वास घेताना तुमच्या शरीराला पुढच्या बाजूस घेऊन जा. यावेळी तुमचं पोट मांडीपर्यंत न्या
चटईला तुमच्या डोक्याचा स्पर्श झाला पाहिजे. त्याचप्रमाणे चटईला स्पर्श होईल या पद्धतीने हात पुढे करा.