पाटणा : एकीकडे महाराष्ट्रात ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या बारावीच्या विद्यार्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना बिहारमध्ये मात्र वेगळीच परिस्थिती आहे. मंगळवारी बिहार बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात तब्बल ६४ % विद्यार्थी नापास झालेत.
पास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्या ३०.११ % आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या बिहार बोर्डाच्या परीक्षेला तेरा लाखा पेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते. त्यापैकी जेमतेम चार लाख विद्यार्थी पास झाले असून बाकीचे जवळ सर्व जण नापास झालेत. गेल्यावर्षी बिहारमध्ये पैसे देऊन परीक्षेत पहिला क्रमांक मिळावणाऱ्यांचं मोठं रॅकेट उघड झालं. त्यानंतर राज्यातल्या मास कॉपीच्या प्रकाराचीही अनेक उदाहरणं पुढे आली.
यंदा मात्र राज्य सरकारनं कॉपीविरोधात मोठी मोहिम उघडली. त्यानंतर आलेल्या या निकालामुळे बिहारमध्ये शिक्षणाच्या दर्जाचीही पोल खोल केलीय..दरम्यान मुलांना परीक्षेला बसल्यावर पास होता येत नसेल, तर यात सरकारचा काय दोष असं खळबळजनक विधान बिहारच्या शिक्षणमंत्र्यांनी निकालानंतर केलं आहे.