पॉर्न पाहण्यासाठी 'या' तरूणीला मिळतो पगार, काय आहे हे विचित्र प्रकरण

जगभरातील कामगार वर्ग कामाला वैतागला आहे.

Updated: Jun 20, 2022, 08:26 PM IST
पॉर्न पाहण्यासाठी 'या' तरूणीला मिळतो पगार, काय आहे हे विचित्र प्रकरण  title=

मुंबई : जगभरातील कामगार वर्ग कामाला वैतागला आहे, यातूनच हा कामगार जॉब सोडत चालला आहे. काहींनी कामाचा ताण, पगार वाढत असल्याच्या कारणाने जॉब सोडत असल्याची कारणे समोर येत आहेत. त्यात आता एका 22 वर्षीय तरूणीला निव्वळ पॉर्न पाहण्याची नोकरी मिळालीय. या नोकरीतून तिला गलेलठ्ठ पगारही मिळणार आहे. त्यामुळे या नोकरीची एक वेगळीच चर्चा आहे.  

काय काम करावं लागतं?
 22 वर्षीय स्कॉटिश मुलीला फक्त पॉर्न व्हिडिओ पाहायचे आहेत. हे व्हिडिओ पाहून तिला पॉर्न व्हिडिओवर संशोधन करावं लागतं.या संशोधनातून कंपनी चांगल्या कल्पना पाहून चांगले पॉर्न व्हिडिओ बनवेल, हा त्यामागचा उद्देश आहे. या कामासाठी मुलीला ताशी 1500 रुपये मिळणार आहेत. तरूणी सध्या बेड-बायबलवरील १०० सर्वाधिक पाहिलेल्या पॉर्न व्हिडिओंवर संशोधन करते आहे. 

९० हजार नागरीकांचा नोकरीसाठी अर्ज 
न्यूयॉर्क पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पॉर्न रिसर्च हेड इन बेड-बायबलच्या या पदासाठी 90 हजारांहून अधिक लोकांनी अर्ज केले होते. या जगभरातील सर्व अर्जांमधून 22 वर्षीय रेबेका डिक्सन निवडली गेली. या खडतर स्पर्धेत रेबेकाने अनेकांना मागे टाकले. 

पॉर्न रिसर्च हेड पदावर 
पॉर्न रिसर्च हेडची नोकरी ही जगातील सर्वोत्तम नोकरी असल्याचे रेबेकाने न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ती म्हणते की हे वेगळ्या प्रकारचे काम आहे. या कामातील वेगवेगळ्या आव्हानांसाठी मी तयार आहे. मी एक खुल्या मनाची मुलगी आहे, मला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही.

पॉर्न रिसर्च हेड म्हणून रेबेकाला पॉर्न व्हिडिओ खूप जवळून पहावे लागतील. पॉर्नचा आवाज आणि त्यात काम करणाऱ्या महिला आणि पुरुषांचाही डेटा गोळा करावा लागणार आहे. यासोबतच त्याला सेक्स पोझिशनची माहिती गोळा करून त्याचा अहवाल लिहावा लागणार आहे.