नेव्हीत पहिल्यांदाच महिला पायलटचा समावेश

नौसेनेमध्ये महिलांना पायलट म्हणून सहभागी करून घेण्याबद्दलची मान्यता 2015लाच देण्यात आली होती. तरीही महिलांना ही संधी अद्याप मिळाली नव्हती. मात्र, केलळमधील इंडियन नेव्हल अॅकेडमीत हा दिवस बुधवारी उजाडला.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 22, 2017, 10:01 PM IST
नेव्हीत पहिल्यांदाच महिला पायलटचा समावेश title=

नवी दिल्ली : नौसेनेमध्ये महिलांना पायलट म्हणून सहभागी करून घेण्याबद्दलची मान्यता 2015लाच देण्यात आली होती. तरीही महिलांना ही संधी अद्याप मिळाली नव्हती. मात्र, केलळमधील इंडियन नेव्हल अॅकेडमीत हा दिवस बुधवारी उजाडला.

केरळमधील इंडियन नेव्ही अॅकेडमीतील पासिंग आऊट परेडमध्ये एका महिलेला संधी मिळाली. शुभांगी स्वरूप असे या महिलेचे नाव आहे. शुभांगीच्या रूपात महिलांना नेव्हीतील पायलट म्हणून पहिल्यांदाच संधी मिळाली. शुभांगी स्वरूप नेव्हीतील सुमुद्री टोही टीमची पायलट असेन.

नवभारत टाईम्स डॉट इंडिया टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शुभांगीला पी-8आय विमानाचे उड्डान करण्याची संधी मिळेल. हिंदी महासागरात चीनच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी जबाबदारी महिला पायलटवर असणार आहे. भविष्यात या महिला एखाद्या जहाजाचीही जबाबदारी सांभाळू शकतात.

दरम्यान, आस्था सेहगल, रूपा ए. आणि शक्तिमाया एस. यांनाही आर्मामेंट इन्सेक्शन ब्रांचमध्ये पहिल्यांदा सहभागी करण्यात आले आहे. महत्त्वाचे असे की, आतापर्यंत एअरफोर्समध्ये तीन फायटर पायलटांना सहभागी करण्यात आले आहे. तसेच, आणखी तीन महिला या भूमिकेत लवकरच येण्याची शक्यता आहे.