सोनिया गांधी यांच्यानंतर आता प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण

Congress leader Priyanka Gandhi Vadra ​ :  काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Updated: Jun 3, 2022, 12:53 PM IST
सोनिया गांधी यांच्यानंतर आता प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण title=

नवी दिल्ली : Congress leader Priyanka Gandhi Vadra  : देशात कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली आहे. कोरोनाचा रुग्णांची संख्येत वाढ होत आहे. आता काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनीच ट्विटरवरुन माहिती दिली. आपल्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करुन घ्यावी, असे आवाहन प्रियांका गांधी यांनी केले आहे. 

कालच काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर प्रियांका गांधी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास पुन्हा एकदा देश निर्बंधांकडे जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी ट्विट केले आहे. माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. सर्व प्रोटोकॉल पाळत मी स्वतःला घरी क्वारंटाईन केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना मी सर्व आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.