Crime News : पंजाबमधील अमृतसरमध्ये पोलिसांच्या वाहनात बॉम्ब ठेवल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये दोन जण पोलिसांच्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवताना दिसल्याचे सांगण्यात आलं आहे. मात्र, या आरोपींचा हेतू काय होता हे स्पष्ट झालेलं नाही. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी काही जणांची चौकशी केली आहे. त्याचवेळी, फुटेजमध्ये दिसणार्या बदमाशांना पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. बॉम्ब ठेवणारे हे पंजाबचे रहिवासी असून त्यांना अमृतसरच्या रस्त्यांची चांगल्या प्रकारे माहिती असल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.
#Amritsar: A bomb was planted under a police inspector's vehicle in Ranjit Avenue area. This vehicle is parked outside the inspector's house. CCTV has also come to light in this case. Currently, the police are investigating the matter. pic.twitter.com/OKaV8ofJhl
— Parmeet Singh Bidowali (@ParmeetBidowali) August 16, 2022
पोलिसांना आव्हान देत दहशत पसरवू पाहणाऱ्या पंजाबमधील गुंडाकडून हे काम केले जाऊ शकते, असा अंदाज पोलिसांना आहे. पोलीस कारवाई आणि अटकेच्या त्रासून गुंड असं करू शकतात. मात्र दहशतवादाशीही याचा संबंध असण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.
दरम्यान, सकाळी गाडी साफ करण्यासाठी आलेल्या तरुणाने ही माहिती पोलिसांना दिली. या गाडी साफ करणाऱ्या तरुणामुळेच अमृतसर बॉम्बस्फोटातून वाचवलं आहे.