भाडेकरूच्या मुलीसोबत जुळलं सुत पण, प्रेमप्रकरणाला पुढे लागलं धक्कादायक वळण!

घर मालकाच्या मुलाने भाडेकरूच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत

Updated: Aug 16, 2022, 08:15 PM IST
भाडेकरूच्या मुलीसोबत जुळलं सुत पण, प्रेमप्रकरणाला पुढे लागलं धक्कादायक वळण! title=

Crime News : अनेक वेळा मुलं मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी धमकी देतात. मुलीसुद्धा या धमकीला घाबरतात होकार देऊन बसतात. मात्र हाच होकार त्यांना पुढे जाऊन अडचणीत आणतो. असच काहीसं प्रकरण समोर आलं आहे. घर मालकाचा मुलगा भाडेकरूच्या अल्पवयीन मुलीची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार करतो. राजस्थानच्या जयपूरमधील आदर्शनगर इथलं प्रकरण आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
पीडित मुलगी ही गेल्या 11 महिन्यांपासून आदर्शनगर इथं आपल्या पाहुण्यांच्या घरी राहत होती. घर मालकाच्या मुलाने तिच्याशी जवळीक वाढवली आणि बोलू लागला. एक महिन्यानंतर मुलाने तिला थेट लग्नासाठी मागणी केली. मुलीने नकार दिला, तरीही त्याने तिला जबरदस्ती करत, होकार नाही दिला तर जीव देईल अशी धमकी दिली. अखेर मुलगी त्याला होकार कळवते.

पीडितेला विश्वासात घेत आरोपी तिच्या घरचे नसताना तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करतो. मात्र एका आठवड्यानंतर घर मालकाचा मुलगा लग्नासाठी नकार कळवतो. त्यामुळे मुलगी घाबरली तिने त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नराधम त्याचं खरं रूप दाखवतो, तो तिला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न करतो आणि  तिच्यावर बलात्कारही करतो.

दरम्यान, जर कोणाला सांगितलं तर तुला जिवंत मारेल, अशी धमकीही आरोपी पीडितेला देतो. पीडितेने सर्व प्रकार घरच्यांना सांगितला त्यानंतर त्यांनी घर मालकाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.