Stock Market च्या भन्नाट तेजीवर 'AMUL'खुश, आपल्या खास शैलीत म्हटले 'Dalals Treat'!

कोटक महिंद्रा AMC चे मॅनेजिंग डायरेक्टर निलेश शाह यांनी एक ट्विट शेअर केले आहे. यामध्ये अमुलचे ब्रॅंडेड कार्टुन दाखवण्यात आले आहे. ज्याला शेअर मार्केटच्या तेजीच्या पार्श्वभूमीवर बनवण्यात आले आहे.

Updated: Sep 2, 2021, 02:45 PM IST
Stock Market च्या भन्नाट तेजीवर 'AMUL'खुश, आपल्या खास शैलीत म्हटले 'Dalals Treat'!

मुंबई : शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून रेकॉर्डब्रेक तेजी दिसून येत आहे. बाजाराच्या जबरजस्त पॉझिटिव अंदाजामुळे गुंतवणूकदार खुश आहेत. या दरम्यान, देशातील सर्वात मोठी डेअरी प्रोडक्ट निर्माती कंपनी आपल्या विशेष कार्टुन्समुळे नेहमी चर्चेत असते. हा अमुलच्या मार्केटिंगचा भाग असला तरी, देशातील चालू घडामोडींवर आधारीत हे कार्टुन नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेते. 

कार्टुनमधील अमुल गर्ल लाल आणि पांढऱ्या रंगाच्या डॉटेड ड्रेसमध्ये दिसून येते. अमुलच्या प्रत्येक जाहिरातींमध्ये ही अमुल गर्ल दिसून येते. नुकतेच अमुलच्या एका कार्टुनने पुन्हा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मुंबईतील शेअर मार्केटची ओळख दलाल स्ट्रीटने होते. सध्या शेअर मार्केटमध्ये रेकॉर्डब्रेक तेजीचे वातवारण आहे. सेक्सेंक्स 57000 अंकांच्या पुढे गेले आहे. तर निफ्टी देखील 17000 च्या पार आहे. हे महत्वाचे लेव्हल ब्रेक केल्यामुळे मार्केट तेजीत आहे.

या पार्श्वभूमीवर अमुल गर्लचे  कार्टुन कोटक महिंद्रा AMCचे निलेश शाह यांनी ट्विट केले आहे. यावर नेटकरी मजेत व्यक्त होत आहेत. तसेच लोकांकडून अमुल को ऑप  बाजाराच्या लिस्टिंगमध्ये असायला हवी अशा प्रतिक्रिया येत आहेत.