मुंबई : देशात मंकीपॉक्स आणि कोरोनाचा धोका आहे. याच दरम्यान अजून एका व्हायरसचा धोका आहे. हा व्हायरस प्राण्यांसाठी धोकादायक आहे. या व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात जनावरांचा मृत्यू होत आहे. गुजरातचे कृषी आणि राघवजी पटेल यांनी याबाबत माहिती दिली आहे.
लम्पी त्वचेचा रोग प्राण्यांमध्ये वेगानं पसरत आहे. त्यामुळे 999 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गाई आणि म्हशींना या आजाराचा धोका जास्त आहे. गुजरातच्या 14 जिल्ह्यांमध्ये हा व्हायरस वेगानं पसरला आहे. महाराष्ट्राशेजारीला राज्यात एवढ्या मोठ्या संख्येनं हा व्हायरस पसरत असल्याने अलर्ट जारी केला आहे.
37 हजार हून अधिक जनावरांना याचा संसर्ग झाला आहे. या रोगाची लस उपलब्ध आहे. 2.68 लाख जनावरांना प्रतिबंधित लस देण्यात आली आहे. या आजारावर उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली आहे.
हा आजार माशा, डास किंवा या व्हायरसचे जंतू अंगावर बसल्याने तो वेगाने पसरतो. या जनावरांच्या संपर्कात आलेल्या जनावरांना हा आजार श्वसनाद्वारे पसरण्याचा धोका आहे. माणसांनाही हा आजार श्वसनाद्वारे संसर्ग होण्याचा धोका असू शकतो का? तर याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. आतापर्यंत भारतात तसा रुग्ण समोर आला नाही.
याशिवाय दूषित पाणी किंवा गवत खाल्लाने देखील हा आजार होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. यामध्ये जनावरांना ताप येणं, डोळे आणि नाकातून पाणी येणं, तोंडातून फेस येणं किंवा लाळ निघणं, जनावरांच्या शरीरावर छोटे फोड, रॅश किंवा गाठीसारखं उठणं असे प्रकार समोर आले आहेत.
याचा परिणाम थेट दूध उत्पादनावर होतो. तसेच गाई-म्हशी अन्न-पाणी पिऊ शकत नसल्याने अशक्त होतात. त्यामुळे या आजाराचा धोका जास्त वाढतो. गुजरातच्या 14 जिल्ह्यांमध्ये या आजाराने थैमान घातलं आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी, दूध उत्पादक, पशुपालन करणाऱ्यांनी आपल्या जनावराला संबंधित लस टोचून घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत या आजाराने 999 जनावरांचा मृत्यू झाला आहे.