दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

CM Arvind Kejriwal :देशाची राजधानीत कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढत आहे.  

रामराजे शिंदे | Updated: Jan 28, 2022, 05:58 PM IST
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण
संग्रहित छाया

रामराजे शिंदे, झी २४ तास, नवी दिल्ली : CM Arvind Kejriwal :देशाची राजधानीत कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोनाबाधितांमुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. (Arvind Kejriwal Tests Positive For Covid)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, यापूर्वी माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी क्वारंटाईन व्हावे आणि त्यांनी तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी.

दिल्ली के CM अरविंद केजरीवाल हुए कोरोना पॉजिटिव, ट्वीट कर कही ये बात

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले की, 'मी कोविड पॉझिटिव्ह आहे. सौम्य लक्षणे आहेत. स्वतः घरीच क्वारंटाईन झालो आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले, त्यांनी कृपया स्वत:ची काळजी घ्यावी, त्यांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी आणि क्वारंटाईन व्हावे, असे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी उत्तराखंडमध्ये गेले होते. डेहराडूनमध्ये अरविंद केजरीवाल यांनी सभेला संबोधित केले. यावर्षी उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी, रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये सभा घेतली.

विशेष म्हणजे दिल्लीत कोरोनाचा आलेख सातत्याने वाढत आहे. सोमवारी दिल्लीत कोरोना संसर्गाचा दर 6.76 टक्के होता. सोमवारी दिल्लीत कोरोना विषाणूचे 4 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले. या कालावधीत 1 हजार 509 बाधितही बरे झाले आहेत.

यापूर्वी रविवारी दिल्लीत कोरोना विषाणूचा संसर्ग दर 4.5 टक्क्यांपेक्षा जास्त होता. रविवारी दिल्लीत कोरोनाचे 3,194 नवीन रुग्ण आढळले, जे सुमारे 7 महिन्यांतील सर्वात जास्त कोरोना रुग्ण होते.