मुंबई : बँकेशी संदर्भात कोणतेही महत्त्वाचे काम करण्याच्या विचारात असाल तरी ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण बँकेचे कर्मचारी पुढील आठवड्यात संपावर (Bank Employee Strike) जाणार आहेत. त्यामुळे बँकिंग सेवेवर (Banking Service) याचा परिणाम होऊ शकतो आणि तुमची कामे रखडू शकतात. 19 नोव्हेबर 2022 रोजी बँकेने संपाचा इशारा दिला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने एक दिवसाचा संप पुकारला आहे.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) आपल्या मागण्यांसाठी 19 नोव्हेंबर 2022 रोजी संपावर जाणार असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच 19 नोव्हेंबरला बँकांचे काम ठप्प होणार आहे. संपाच्या दिवशी बँक शाखा आणि कार्यालयांमध्ये कामकाज सुरू ठेवण्यासाठी सर्व योग्य पावले उचलली जात आहेत, पण बँक कर्मचारी संपावर गेल्यास बँक शाखा आणि कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, असेही बँकेने म्हटले आहे.
19 नोव्हेंबर 2022 रोजी शनिवारी आहे आणि बँक प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असते. मात्र या महिन्याच्या तिसऱ्या शनिवारीही संपामुळे बँकिंग सेवा प्रभावित होणार आहेत.
शनिवारी संपामुळे बँकांचे कामकाज बंद राहणार असून दुसऱ्या दिवशी रविवार असणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर ते या आठवड्यातच करा. पुढचा दिवस रविवार असल्याने सर्वसामान्यांना दोन दिवस एटीएममध्ये रोकड काढताना समस्या येऊ शकते.