November bank holidays India: दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळी हा देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा सण आहे. दिव्यांची आरास करत, दारी कंदील लावून, फराळ, गोडधोड मिठाई देऊन हा सण साजरा केला जातो. येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यातही दिवाळीची सुट्टी मिळणार आहे. आनंदाची बाब म्हणजे नोव्हेंबरमध्ये एकूण 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. पण सुट्ट्या कशा असतील? कोणत्या असतील? सविस्तर जाणून घेऊया.
नोव्हेंबर महिन्यात 13 दिवस बॅंक हॉलीडे असेल. पण सर्वच राज्यांना या सरसकट 13 सुट्ट्या नसतील. देशभरात सर्व राज्यांना काही सुट्ट्या एकाच वेळी असतील. तर काही सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यातील सण आणि विशेष दिवसांच्या निमित्ताने संबंधित असतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बॅंकाच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करते. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर या सुट्ट्यांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
प्रत्येक महिन्याच्या सर्व रविवारी आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी देशभरात बँका बंद असतात. या काळात बँकांमध्ये कोणतेही काम होत नाही. त्याचबरोबर कधी-कधी रिझर्व्ह बँक निवडणुका किंवा इतर कारणांमुळे सुटीही जाहीर करते. महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे येथील बॅंकांना सुट्टी असेल.
नोव्हेंबर महिना अनेक सण घेऊन आला आहे. यामध्ये दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजा), कुट सण, कन्नड राज्योत्सव, बलिपद्यामी, विक्रम संवत नववर्ष दिन, छठ (संध्याकाळी अर्घ्य), छठ (सकाळ अर्घ्य)/वंगळा उत्सव, इगास-बागवाल, गुरु नानक जयंती/कार्तिक पूर्ण यांचा समावेश आहे. पौर्णिमा, कनकदास जयंती, सेंग कुटसनेम आदींचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेच्या कॅलेंडरनुसार या काळात बँका बंद राहतील.
1 नोव्हेंबर (शुक्रवार): त्रिपुरा, कर्नाटक, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, मेघालय, सिक्कीम आणि मणिपूरमध्ये दिवाळी, कुट महोत्सव आणि कन्नड राज्योत्सवानिमित्त बँका बंद राहतील.
2 नोव्हेंबर (शनिवार): गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये दिवाळी (बली प्रतिपदा) / बलीपद्यामी / लक्ष्मी पूजा (दीपावली) / गोवर्धन पूजा / विक्रम संवत नवीन वर्षाच्या दिवशी बँका बंद राहतील.
3 नोव्हेंबर (रविवार): देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
7 नोव्हेंबर (गुरुवार): बंगाल, बिहार, झारखंड या राज्यांमध्ये छठ (संध्याकाळ अर्घ्य) निमित्त बँका बंद राहणार आहेत.
8 नोव्हेंबर (शुक्रवार): बिहार, झारखंड आणि मेघालय सारख्या राज्यांमध्ये छठ (सकाळी अर्घ्य)/वंगला उत्सवानिमित्त बँका बंद राहतील.
9 नोव्हेंबर (शनिवार): महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशभरातील सर्व बँकाना सुट्टी असेल.
10 नोव्हेंबर (रविवार): रविवारची सुट्टी असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
12 नोव्हेंबर (गुरुवार): उत्तराखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, उत्तराखंड, हैदराबाद-तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू, उत्तर प्रदेश, नागालँड, बंगाल, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, इगास-बागवालच्या निमित्ताने श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार आहेत.
15 नोव्हेंबर (शुक्रवार): मिझोराम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, उत्तराखंड, हैदराबाद-तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू, उत्तर प्रदेश, नागालँड, बंगाल, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, श्रीनगरमध्ये गुरुनानक जयंती/कार्तिक पौर्णिमा/रहस पौर्णिमेनिमित्त बँक हॉलीडे असेल.
17 नोव्हेंबर (रविवार): देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
18 नोव्हेंबर (सोमवार) : कनकदास जयंतीनिमित्त कर्नाटकात बँकांना सुट्टी असेल.
23 नोव्हेंबर (शनिवार): मेघालयमध्ये सेंग कुत्स्नेमनिमित्त बँका बंद राहतील. महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
24 नोव्हेंबर (रविवार): देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
बँकेला सुट्टी असेल त्या दिवशी तुम्ही डिजिटल बँकिंगचा वापर करु शकता. डिजिटल बँकिंगद्वारे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला कधीही पैसे पाठवू शकता किंवा मिळवू शकता. तसेच जवळच्या एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्याची सुविधादेखील आहे.. तुम्ही पैसे पाठवण्यासाठी किंवा काही ऑर्डर करण्यासाठी यूपीआयदेखील वापरू शकता. UPI सुविधा 24 तास उपलब्ध असते.