बंगळुरू: आपलं घर कोसळताना जेवढ्या वेदना होतात असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. अख्खी इमारतच जवळपास 4 ते 5 सेकंदात पत्त्यासारखी कोसळली आहे. ही इमारत आधीच धोकादायक बनली होती. त्यामध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस एवढंच निमित्त झालं. इमारत कोसळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भलीमोठी इमारत काही सेकंदात डोळ्यादेखत जमीनदोस्त झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांतील ही चौथी घटना आहे. बेंगळुरू महापालिका आयुक्त गौरव गुप्ता यांनी झोनल आयुक्तांना सर्वेक्षण करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे बांधलेल्या इमारती ओळखण्यासाठी एक समिती स्थापन करण्यास सांगितले. त्याचवेळी, 27 सप्टेंबर रोजी बेंगळुरूच्या लकसंद्रा भागात 70 वर्ष जुनी इमारत कोसळली. यावेळी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. सुमारे 50 लोक थोडक्यात बचावले.
धोकादायक इमारतीमधून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. त्यामुळे या लोकांचा जीव वाचला. बेंगळुरूच्या पश्चिम भागातील कमला नगरमधील चार मजली इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. अग्निशमन दल, आपत्कालीन सेवा अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी उपस्थित होते.
बंगळुरू महानगरपालिकेने सांगितले की, त्या घरांमध्ये आणि आसपास राहणाऱ्या सर्व लोकांना दुसऱ्या ठिकाणी तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. या कुटुंबांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
#WATCH | Karnataka: Bruhat Bengaluru Mahanagara Palike (BBMP) demolished building in Vrushabhavathi ward near Shankar Nag bus stand in Bengaluru, earlier today. pic.twitter.com/bTk8dRKuli
— ANI (@ANI) October 13, 2021