बनावट लसींचे केंद्राला टेन्शन, राज्यांना सतर्कतेचे आदेश... अशी ओळखा बनावट लस, पाहा व्हिडीओ

केंद्र सरकारने गंभीर दखल घेत राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Updated: Sep 6, 2021, 09:10 PM IST
बनावट लसींचे केंद्राला टेन्शन, राज्यांना सतर्कतेचे आदेश... अशी ओळखा बनावट लस, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : ही बातमी आहे बनावट लसीकरणासंदर्भातील देशात कोरोनाचे लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू असतानाच आता केंद्र सरकार समोर आता एक नवीन प्रकरण समोर आलंय ते म्हणजे बनावट लसींचं. अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या बनावट लसी आढळून आल्या आहेत. लस माफियांकडून हुबेहूब पॅकिंग असलेल्या बनावट लस उपलब्ध केल्या जाताय असल्यामुळे नागरिकांना लस देण्याआधी ती बनावट तर नाही ना याची खातरजमा करावी, असे निर्देश देण्यात आले आहे.

केंद्र सरकारने गंभीर दखल घेत राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच सरकारने कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक-व्ही या लसींची सत्यता पडताळण्यासाठी अवश्यक असलेली माहिती पाठवली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडूनही बनावट लसीबाबत इशारा

दक्षिण पूर्व अशिया आणि आफ्रिकेत ऍस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्डची कोविशिल्ड ही बनावट लस आढळून आली आहे. त्यामुळे बनावट लसींबाबत जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोविशिल्डची खरी लस कशी ओळखणार?

कोविशिल्डची खरी लस ओळखण्यासाठी लसीच्या बाटलीवर खालील माहिती पहावी, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.
-सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे (SIS) प्रोडक्ट लेबल पहावे.
-ट्रडमार्कसोबत ब्रँड (कोव्हिशिल्ड) नाव असावे.
-जनेरिक नावाचा शब्द बोल्ड नसावा.
-लेबल गडद हिरव्या रंगाचा असावा आणि त्यावर ऍल्युमिनिअम क्लिपचे सील असावे
-त्यावर सीजीएस नॉट फॉर सेल असा शिक्का असेल.