भय्यू महाराज आत्महत्या | भय्यूंविषयी महत्वाच्या ५ गोष्टी

अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

Updated: Jun 12, 2018, 07:03 PM IST
भय्यू महाराज आत्महत्या | भय्यूंविषयी महत्वाच्या ५ गोष्टी title=

इंदूर : अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी गोळी झाडून आत्महत्या केली आहे. भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या भक्त परिवाराला धक्का बसला आहे. भय्यूजी महाराज यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचं, इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झालं आहे. भय्यूजी महाराज यांना राजकीय तसेच उद्योजकांशी चांगले संबंध होते. भय्यूजी महाराज यांच्याविषयी महत्वाच्या ५ गोष्टी खाली वाचा.

१) भय्यूजी महाराज हे कधीकाळी मॉडेलिंग करत होते. मॉडेलिंगचं करिअरसोडून त्यांनी अध्यात्मचा रस्ता निवडला. सियाराम शुटिंगचे भय्यूजी महाराज मॉडेल देखील राहिले होते.

२) ते इतर अध्यात्मिक गुरूंपेक्षा अगदी वेगळे होते. ते कधी तरी शेतात काम करताना दिसत होते, तर कधी क्रिकेट खेळताना, घोडेस्वारी आणि तलवारबाजीनेही ते पारंगत होते.

३) मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील शुजालपूर येथे २९ एप्रिल १९६८ रोजी भय्यू महाराज यांचा जन्म झाला, त्यांच्या चाहत्यांची अशी भावना होती की, त्यांना श्री दत्त प्रसन्न आहेत, महाराष्ट्रात त्यांना राष्ट्र संत देखील काही लोक मानतात. भय्यूजी सूर्याची देखील उपासना करता, अनेक तास जलसमाधी घेण्याचा देखील त्यांना अनुभव होता.

४) भय्यूजी महाराज यांचे सासरे कधीकाळी महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी देखील होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी, संघ प्रमुख मोहन भागवत अशी मंडळी देखील त्यांना मानत होती.

५) भय्यूजी महाराज ग्लोबल वॉर्मिंगने देखील चिंतेत होते. यासाठी त्यांनी गुरू दक्षिणेच्या नावावर झाडं देखील लावले होते. असं म्हणतात की आतापर्यंत भय्यूजी महाराज यांनी १८ लाख झाडं लावली होती. आदिवासी जिल्हा देवास आणि धारमध्ये त्यांनी जवळ जवळ १ हजार तलाव खोदले होते, ते समारंभात नारळ, शॉल आणि फुलांचे हार स्वीकारत नसतं.