व्हिडिओ :...जेव्हा हॅलिकॉप्टरमधून उतरताना अमित शाहांचा घसरला पाय

त्यांना पडलेलं पाहताच सुरक्षा रक्षकांनी लगेचच सावरल्याचेही यामध्ये दिसतंय.

Updated: Nov 24, 2018, 01:45 PM IST
व्हिडिओ :...जेव्हा हॅलिकॉप्टरमधून उतरताना अमित शाहांचा घसरला पाय  title=

मिझोरम : मिझोरमच्या विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्व राजकीय पक्षांचा निवडणूक प्रचारही जोरदार सुरू आहे. टुईपुई विधानसभा क्षेत्र हा मिझोरमचा मागास विभाग मानला जातो. इथे चकमा जमातीचे वर्चस्व आहे. भाजपा याठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मेहनत घेत आहे. मिझोरमच्या 40 विधानसभा जागांवर 28 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याची मतमोजणी 11 डिसेंबरला होईल. दरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शाहदेखील मिझोरममधील आदिवासींना भेटण्यासाठी पोहोचले. यावेळी एक छोटीशी घटना घडली.

अमित शाह जमिनीवर

पश्चिम टुईपुई विधानसभा क्षेत्रात अमित शाहा हेलीकॉप्टरने उतरताना जमिनीवर पडल्याचे वृत्त 'लेटस्ट ली' वेबसाईटने दिलंय. शाह यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनलाय. हॅलीकॉप्टरमधून उतरताना पाय घसरल्याने अमित शाह जमिनिवर पडल्याचे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतंय. त्यांना पडलेलं पाहताच सुरक्षा रक्षकांनी लगेचच सावरल्याचेही यामध्ये दिसतंय. सुदैवाने त्यांना यामध्ये कोणती इजा झाली नाही.  त्यानंतर ते स्वत: चालत रॅलीच्या दिशेने जाताना दिसले. 

 

काँग्रेसची सत्ता 

मिझोरम पुर्वोत्तरचं असं एकमेव राज्य आहे जिथे काँग्रेसची सत्ता आहे. गेल्या 21 वर्षांपासून त्रिपुरातील शरणार्थींना मतदान करण्यासाठी निवडणूक आयोग मिझोरम-त्रिपुरा सीमेवर कान्हमून गावात मतदान केंद्र स्थापित करेल. रियांग जमातीचे एकूण 35 हजार शरणार्थींमध्ये 11 हजार 232 योग्य मतदाता असणार आहेत. यामध्ये पुरूष आणि महिला दोन्ही मतदार आहेत.