८०० कोटींचा घोटाळा : विक्रम कोठारी सीबीआयच्या ताब्यात

पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यानंतर आता रोटोमॅक कंपनीच्या मालकावरही बॅकेंचे कर्ज न फेडल्याचा आरोप आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 19, 2018, 01:03 PM IST
८०० कोटींचा घोटाळा : विक्रम कोठारी सीबीआयच्या ताब्यात  title=

कानपूर : पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यानंतर आता रोटोमॅक कंपनीच्या मालकावरही बॅकेंचे कर्ज न फेडल्याचा आरोप आहे.

सोमवारी सकाळी 'सीबीआय'ने विक्रम कोठारीला ताब्यात घेतले. रविवारी रात्री कोठारी विरोधात तक्रार दाखल झाली होती. 

सकाळी अटक 

सोमवारी सकाळी ४ वाजता सीबीआयच्या टीमने कानपुरमध्ये कोठारीच्या ३ ठिकाणांवर छापेमारी केली. ८०० कोटींचे कर्ज चुकविण्याच्या प्रकरणात बॅंक ऑफ बडोदाच्या तक्रारीवरून ही छापेमारी करण्यात आली आहे. 

सीबीआयचे छापे 

 याप्रकरणी सीबीआय टीमने विक्रम कोठारीची पत्नी आणि मुलांकडे चौकशी केली. कानपुरच्या टिळक नगरमधील 'संतुष्टी',रोटोमॅक ऑफिस आणि एका ठिकाणावर सीबीआयने छापा मारला. 

कोण आहे विक्रम कोठारी ? 

कोठारीचा संबंध 'पान पराग'शी आहे. त्याचे वडील मनसुख भाई कोठारी गुजराती परिवाराशी संबंधित आहेत.

त्यांनी १९७३ मध्ये पान मसाल्याचा व्यवसाय सुरू करत पान पराग असे नाव दिले.१९८३ ते १९८७ दरम्यान पान पराग ही जाहिरात करणारी सर्वात मोठी कंपनी.

कोणाकडून किती कर्ज ?

 बॅंक ऑफ इंडिया : १३९५ कोटी 
 बॅंक ऑफ बडोदा : ६०० कोटी 
 युनियन बॅंक : ४८५ कोटी
 इलाहाबाद बॅंक : ३५२ कोटी 
 
याव्यतिरिक्त कोठारीवर ६०० कोटी रुपयांचा चेक बाऊंस प्रकरणाचीही तक्रार आहे. यामध्ये पोलिस त्याची चौकशी करतेय.

काय म्हणाला विक्रम ?

पहिली गोष्ट तर याला घोटाळा म्हणून नका आणि दुसरी गोष्ट  मी देशसोडून पळाले नाही तर कानपूरमध्येच आहे असे विक्रमने रविवारी सांगितले.

बॅंकेने माझ्या कंपनीला बॅंकेतर्फे नॉन परफॉर्मर ठरविण्यात आले, डिफॉल्टर नाही. बॅंकेतून घेतलेल्या कर्जाचे प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) कडे आहे. मी कर्ज घेतलय आणि लवकरच ते फेडणार आहे, असेही त्याने सांगितले.