मुंबई : जर तुम्ही देखील तुमच्या मुलीच्या भविष्याच्या दृष्टिकोणातून करुन काही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्ही सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजनांचाही फायदा घ्यायला हवा. मुलींच भविष्य समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने 'सुकन्या समृद्धि योजना' (Sukanya Samriddhi Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या 80 सी (80C) नुसार गुंतवणूकीवर सुट मिळते. आज आम्ही तुम्हाला 'सुकन्या समृद्धि योजना' (Sukanya Samriddhi Yojana) मध्ये झालेल्या 5 मोठ्या बदलांविषयी सांगणार आहोत.
याआधी 80सी (80C) नुसार, टॅक्समध्ये मिळणारी सुट ही केवळ दोन मुलींच्या खात्यांवर मिळत होती. तीसऱ्या मुलीला या योजनेमध्ये कोणताही लाभ मिळत नव्हता. जर तुम्हाला एका मुली नंतर दोन जुळ्यामुली असतील तर त्या दोन मुलींचे खाते उघडण्याची सुद्धा मुभा दिली गेली आहे.
या खात्यामध्ये प्रत्येक वर्षी किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करण्याची सुविधा आहे. जर तुम्ही किमान रक्कम जमा नाही केली तर तुमचं खातं हे डिलीट केलं जातं. नव्या नियमांनुसार, खातं पुन्हा अॅक्टिव्ह नाही केलं गेलं तर त्या खात्यात जमा असणाऱ्या रकमेवर मॅच्यूरिटी पर्यंत चालू दराप्रमाणे व्याज मिळेल. यापुर्वी ही सुविधा या योजनेमध्ये दिली गेली नव्हती.
नव्या नियमांनुसार मुलींना 18 वर्षांपर्यंत या खात्यामध्ये ट्रांजेक्शन करण्याची मुभा दिली गेली नाही. तोपर्यंत केवळ पालकचं या खात्यामध्ये ट्रांजेक्शन करु शकतात. याआधी ही वय मर्यादा 10 वर्षांची होती.
नव्या नियमांनुसार, खात्यामध्ये चुकीचं व्याज वापस करण्याचं सुविधा बंद केली आहे. याव्यतिरिक्त खात्याचं व्याज हे प्रत्येक आर्थिक वार्षाच्या शेवटी जमा केला जाणार आहे.
या योजनेचं खातं हे मुलीच्या मृत्यूनंतर बंद केलं जाऊ शकतं. सध्या यामध्ये खातेदाराच्या गंभीर आजाराचाही समावेश केला गेला आहे. अशा वेळी देखील खातं बंद केलं जाऊ शकतं. तसेच, पालकाचा मृत्यू झाल्यावरही हे खातं बंद केलं जाऊ शकतं.